शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

निधी मंजूर, मात्र काम रखडले

By admin | Updated: July 10, 2014 23:41 IST

लघुपाटबंधारे उपविभाग नवेगावबांध अंतर्गत व सौंदड येथील लघुपाटबंधारे कार्यालयाच्या मध्यमातून सन २०११-१२ मध्ये सौंदड येथील तलावाच्या कामासाठी दिड कोटी रुपये मंजूर झाले होते.

सौंदड : लघुपाटबंधारे उपविभाग नवेगावबांध अंतर्गत व सौंदड येथील लघुपाटबंधारे कार्यालयाच्या मध्यमातून सन २०११-१२ मध्ये सौंदड येथील तलावाच्या कामासाठी दिड कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र लोकप्रतिनिधींनी श्रेय लाटण्यासाठीच सदर तलावाचे काम रखडवून ठेवण्यात आले आहे. नवेगावबांध येथील उपविभागीय अधिकारी गजभिये यांनी सन २०१२ मध्ये राजोली व सौंदड येथील तलावाच्या कामासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. तसेच स्थानिक आ. राजकुमार बडोले यांनीसुद्धा या तलावाच्या कामासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. सन २०१२ मध्ये अडीच कोटी रुपये सौंदड व राजोली या दोन्ही तलावासाठी मंजूर करण्यात आले. सौंदड तलावाचे काम सुरु होणार एवढ्यात लोकप्रतिनिधींनी श्रेय लाटण्यासाठी राजकारण केल्याने या तलावाचे काम सुरु होण्यापूर्वीच रखडले. या कामाचा निधीही रोखण्यात आला, असे उपविभागीय अधिकारी गजभिये यांनी सदर प्रतिनिधीजवळ बोलून दाखविले.सन २०१४ मध्ये राजोली येथील तलावाच्या नहराच्या कामावर एक कोटी रुपये खर्च करुन नहराचे काम करण्यात आले. परंतु सौंदड तलावाचे काम श्रेय लाटण्याच्या भानगडीत अडकले. यामध्ये सौंदड तलावाच्या सांडण्याच्या पश्चिम दिशेच्या बाजूला पाणी लिकेज होते. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी वाया जाते. तसेच तलावाच्या पाळीला अनेक भेगा पडल्या असून पावसाळ्यात जोराचा पाऊस पडला तर तलाव भरुन सांडवा तलावाची पाळ फुटण्याची दाट शक्यता आहे. जेव्हा पाळ व सांडवा फुटेल तेव्हा लोकप्रतिनिधी व स्थानिक पाणी वाटप कमेटीला जाग येर्ईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सन २०१२-१३ मध्ये जलसंधारण विभागाने तलावाच्या खोलीकरणाच्या नावावर रपट्याच्या बाजूने तलावाच्या किणाऱ्या लगतची माती काढून तलावाच्या पाळीवर टाकली. या खोलीकरणाच्या कामासाठी शसनाकडून एक कोटी २२ लाख रुपये मंजूर झाले होते. परंतु या रकमेपैकी २२ लाखाचेही काम करण्यात आले नाही. अधिकाऱ्यामार्फत संबंधित निधी परस्पर गोठाविली. या कामातही लाखोचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड आहे. तलावाच्या पाळीवर किनाऱ्यालगतची माती पाळीवर टाकण्यात आली. परंतु पाळीवर मुरुम न टाकल्याने पाळीवरील माती पावसाळ्यात वाहून गेल्याने पाळीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. याकडे पाटबंधारे विभागाचे व स्थानिक पाणी वाटप कमेटीने दुर्लक्ष केले आहे. (वार्ताहर)