शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

राज्यमंत्रिपदापाठोपाठ फुके यांच्याकडे दोन जिल्ह्याचे पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 23:55 IST

अल्पावधीत भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात आपली छाप सोडणारे डॉ.परिणय फुके यांना राज्यमंत्रीपदापाठोपाठ भंडारा आणि गोंदिया दोन जिल्ह्यांचे पालकत्व देण्यात आले.

ठळक मुद्देपक्ष बांधणीत यश : लोकसभेतील कामाची पावती अन् विधानसभेवर डोळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अल्पावधीत भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात आपली छाप सोडणारे डॉ.परिणय फुके यांना राज्यमंत्रीपदापाठोपाठ भंडारा आणि गोंदिया दोन जिल्ह्यांचे पालकत्व देण्यात आले. दांडगा जनसंपर्क, अभ्यासू व्यक्तीमत्व आणि मितभाषी असलेल्या डॉ. परिणय फुके यांनी दोन्ही जिल्ह्यातील भाजपा नेत्यांना एकत्र आणून लोकसभेचा गढ सर केला होता. त्याच कामाची ही पावती असून विधानसभेची मोठी जबाबदारी त्यांच्यावरच राहणार असल्याचे संकेत पालकमंत्रीपदाची जबाबदारी देऊन अप्रत्यक्षपणे देण्यात आले आहे.डॉ. परिणय फुके यांनी नागपूर महानगरपालिकेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली.नगरसेवक असताना त्यांनी विकास कामांचा धडाका लावला.अडीच वर्षापुर्वी त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेसाठी तिकीट देण्यात आली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करीत ते विधान परिषदेत पोहचले. अल्पावधीत त्यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आपल्या कार्यातून ठसा उमटवला.सर्वप्रथम या दोन जिल्ह्यात विखुरलेल्या भाजपा नेत्यांना एकत्र आणले. त्यामुळेच लोकसभेचा गढ सर करणे भाजपाला शक्य झाले. दांडग्या जनसंपर्काच्या भरोशावर त्यांनी आपली छाप सोडली. विधान परिषदेच्या माध्यमातून अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. मागील ६० ते ७० वर्षांपासून रेंगाळलेला नझुल पट्ट्यांचा प्रश्न डॉ.परिणय फुके यांनी अवघ्या महिनाभरात सोडविला.त्यामुळे हजारो नझुल पट्टेधारकांना दिलासा मिळाला. यासह त्यांनी अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेत. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. फुके यांच्यावर लोकसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी देण्यात होती. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दोन महिने या मतदारसंघात तळ ठोकून योग्य नियोजन केले. त्यामुळेच राष्टÑवादीच्या ताब्यातील मतदारसंघ पुन्हा एका भाजपा ताब्यात घेत वर्चस्व स्थापन केले. भाजपाला या मतदारसंघात मिळालेल्या यशात डॉ.फुके यांचा वाटा कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळेच गत १५ दिवसापूर्वी राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारात त्यांना राज्यमंत्री करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम वने आणि आदिवासी विभाग खात्याचे ते राज्यमंत्री झाले. त्यानंतर अवघ्या १५ दिवसातच त्यांच्याकडे भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याचे पालकत्वाची जबाबदारी देण्यात आली. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, त्यांच्याकडे या दोन जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आल्याचे बोलल्या जाते. सहा विधानसभा क्षेत्राची जबाबदारी डॉ. फुके यांच्याकडेच राहणार यात आता तिळमात्रही शंका राहिलेली नाही. फुके भंडारा-गोंदियाचे पालकमंत्री झाल्याचे वृत्त धडकताच दोन्ही जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

टॅग्स :Parinay Fukeपरिणय फुके