शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

शेतमजुरांचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: July 8, 2016 01:54 IST

शेतकरी- शेजमजूर-दलीत-आदिवासी विरोधी निती व जिवघेण्या महागाईच्या विरोधात भारतीय शेत मजूर युनियनच्या देवरी कौसींलच्यावतीने एसडीओ ...

पटले यांची मागणी : सीईओंना दिले निवेदन गोंदिया : शेतकरी- शेजमजूर-दलीत-आदिवासी विरोधी निती व जिवघेण्या महागाईच्या विरोधात भारतीय शेत मजूर युनियनच्या देवरी कौसींलच्यावतीने एसडीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. क्रांतीकारी शहीद भगतसिंग कामगार भवन येथून महासचिव शेखर कनौजिया यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. वन व महसूल जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, वन हक्क कायद्यातील गैर आदिवासींकरिता असलेली तीन पिढ्याच्या दाखल्याची अट रद्द करावी, मनरेगा कायदा मजबूत करुन वर्षातून २०० दिवस काम व ३०० रुपये दैनिक मजुरी दर आठवड्याला देण्यात यावी, प्रत्येक गरजू कुटूंबाला ३ लाख रुपयांचे घरकूल बनवून देण्यात यावे, बीपीएल कार्डावर दरमहा ३५ किलो रेशन स्वस्त दरात देण्यात यावे, सतत वाढत्या महागाईला पाहता सर्व निराधारांना किमान १५०० रुपये देण्यात यावे व वृद्ध निराधारांसाठी ६५ ऐवजी ६० वर्षांची अट ठेवण्यात यावी, बीपीएलची नवीन यादी बनविण्यात यावी, तिव्रगतीने वाढत्या महागाईवर आळा घालून तात्काळ जमाखोरी, मुनाफाखोरी, काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गोदामात छापे घालून त्यांच्यावर कडक कारवाई करा, निराधारांचे प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यात यावे आणि निराधारांना मानधन नको, कायदा करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. मोर्चासाठी बाबुलाल पारधी, यादोराव वाढई, पवन मानकर, मोतीराम कोराम, रामदास नंदरधने, रेखा ताराम, शांता शहारे, पंचशिला नंदेश्वर, सुक्षकला नंदागवळी, पुष्पा परतेकी, उर्मिला मानकर, गणपत फुंडे आदिंनी सहकार्य केले. (वार्ताहर)