लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : महाराष्ट्र शासनाने १२ जानेवारी रोजी काढलेल्या अधिसुचनेचा विरोध करण्यासाठी शिवश्री बिल्डिंग मटेरियल सप्लायर संघटनेच्यावतीने शुक्रवारी (दि.१६) सरकारच्या मनमर्जी नियमांच्या विरोधात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.शासनाने काढलेल्या जाचक अटींच्या आदेशामुळे बिल्डिंग मटेरियल आणि सप्लायर मोठ्या अडचणीत आले आहे. या विरोधात सडक-अर्जुनी तालुक्यातील संघटनेच्या वतीने शासनाच्या विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते ट्रॅक्टरचा धडक मोर्चा नवेगावबांध फाट्यावरुन कोहमारा आणि नंतर येथील तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.सर्वप्रथम १२ जानेवारी रोजी काढलेल्या जाचक आदेशाची होळी करण्यात आली. त्यानंतर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, माधव तरोणे, कृष्णा ठलाल यांची भाषणे झाली.संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्य निवेदनातून साधनानिहाय दंडाची रक्कम १ लाख २ लाख रुपये अट रद्द करावी, महाराष्ट्र जमीन महसूल नियम २०१७ दि.१२ जानेवारी वैयक्तिक जातमुचलका अट रद्द करण्यात यावी, गौण खनिज प्रतिबंध गाव समिती रद्द करण्यात यावी, रेती घाट लिलाव झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, दंड आकारताना शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील बाजार भाव मुल्याचे ३ पट दंड आकारण्यात यावे.तालुक्यातील संघटनेकरीता कमीत कमी दोन घाट आरक्षीत करुन द्यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता. धडक ट्रॅक्टर मोर्चाने शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. मोर्चाचे नेतृत्व माधवराव तरोणे, शामा मेंढे, सुधाकर चांदेवार, दिपक गहाणे, दिनेश कोरे, डिगांबर पातोडे, बापू भेंडारकर, महेंद्र डोंगरे, महेंद्र वंजारी, मुकेश अग्रवाल, चुन्नीलाल मेश्राम यांनी केले. सभेचे संचालन करून प्रास्ताविक महेश डुंबरे यांनी मांडले. आभार हेमराज लाडे यांनी मानले.
सरकार विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:27 IST
अर्जुनी : महाराष्ट्र शासनाने १२ जानेवारी रोजी काढलेल्या अधिसुचनेचा विरोध करण्यासाठी शिवश्री बिल्डिंग मटेरियल सप्लायर संघटनेच्यावतीने शुक्रवारी (दि.१६) सरकारच्या मनमर्जी नियमांच्या विरोधात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
सरकार विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा
ठळक मुद्देशासन आदेशाची होळी : बिल्डिंग मटेरियल सप्लायर संघटना आक्रमक