शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ३० टक्के लाभार्थ्यांवर मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:30 IST

गोंदिया : गोरगरीब रुग्णांची आरोग्यविषयक उपचारासाठी परवड होऊ नये, उपचाराअभावी एखाद्याचा बळी जाऊ नये, त्यांना चांगल्या रुग्णालयात उपचार घेता ...

गोंदिया : गोरगरीब रुग्णांची आरोग्यविषयक उपचारासाठी परवड होऊ नये, उपचाराअभावी एखाद्याचा बळी जाऊ नये, त्यांना चांगल्या रुग्णालयात उपचार घेता यावेत यासाठी शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेचे जिल्ह्यात एकूण ६ लाख २ हजार १९ लाभार्थी असून, यापैकी आतापर्यंत १ लाख ७५ हजार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. एकंदरीत ही योजना गोरगरीब लाभार्थ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली. जिल्ह्यातील सहा शासकीय आणि सहा खासगी रुग्णालयांत या योजनेच्या लाभार्थ्यांवर उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली. बऱ्याच शस्त्रक्रिया आणि औषधोपचाराचा खर्चसुद्धा या योजनेंतर्गत दिला जातो. रुग्ण संबंधित योजनेच्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शस्त्रक्रिया किंवा औषधोपचाराच्या खर्चाची रक्कम शासनातर्फे संबंधित रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा केली जात असल्याने गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांची पैशांअभावी होणारी परवड बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. या योजनेत काही त्रुटीदेखील असून, त्या दूर केल्यास ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल.

.............

अशी करा नोंदणी

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड आणि आधारकार्ड घेऊन केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील या विभागाकडे नोंदणी करावी लागते. त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक कार्ड या विभागाकडून लाभार्थ्याला दिले जाते. हे कार्ड दाखवून या योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयात जाऊन रुग्णांना लाभ घेता येतो.

.........

८० हजार रुपयांपर्यंतचे पॅकेज

-महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्याला दीड लाख रुपयांपर्यंत या योजनेतून आणि प्रधानमंत्री योजनेंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे औषधोपचार आणि शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

- योजनेत समाविष्ट असलेल्या खासगी रुग्णालयाचे विविध शस्त्रक्रियेचे शुल्क निश्चित केले आहे. याअंतर्गत रुग्णावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर संबंधित रक्कम रुग्णालयाकडे जमा केली जाते. ८० हजार रुपयांपर्यंतच्या शस्त्रक्रियेच्या पॅकेजचासुद्धा समावेश आहे.

- या योजनेंतर्गत लाभार्थ्याने औषधोपचाराचा खर्च स्वत: केला असेल तर तो बिल जमा केल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

........

अशी करा तक्रार

- महात्मा फुले जनआरोग्य योजनेसंबंधातीत काही तक्रार असल्यास जिल्हाधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कक्षाकडे, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे करता येते.

- तक्रारीसाठी ई-मेल किंवा पोस्टानेसुद्धा तक्रार करता येते. आलेल्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन त्यांचा आठ दिवसांत निपटारा केला जातो.

- या विभागाकडे जिल्ह्यातून आतापर्यंत २८० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी २७२ तक्रारींचा निपटारासुद्धा करण्यात आला आहे.

- लाभार्थ्यांच्या मदतीसाठी आरोग्यमित्र, तसेच टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

...............

पाठपुराव्यानंतर मिळाला उपचाराचा खर्च

-मी महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अँजिओप्लास्टी केली होती. यासाठी मला ८० ते ९० हजार रुपयांचा खर्च आला होता. सुरुवातीला हा खर्च मिळण्यास विलंब झाला होता. मात्र, या विभागाकडे यासंबंधी तक्रार केल्यानंतर तो आठ ते दहा दिवसांत मिळाल्याचे या योजनेचे लाभार्थी जितेंद्र सोनुले यांनी सांगितले.

- गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना लाभदायक ठरत आहे. रुग्णाचा सर्व खर्च या योजनेतून केला जात असल्याने बरीच मदत होत असल्याचे प्रमोद बागडे यांनी सांगितले.

- महात्मा फुले जनआरोग्य योजना ही चांगली असून, यात जवळपास १२९९ उपचारांचा समावेश आहे. या योजनेत अजून काही योजनांचा समावेश करण्याची गरज असल्याचे तुषार पिल्लेवान या लाभार्थ्याने सांगितले.

.................

योजनेंतर्गत जुडलेल्या रुग्णालयांची संख्या : १२

एकूण कोरोनाबाधित रुग्ण :

एकूण उपचार सुरू असलेले रुग्ण :

एकूण कोरोनामुक्त झालेले रुग्ण :

आतापर्यंत झालेले मृत्यू :

योजनेचा लाभ घेतलेले एकूण रुग्ण : १ लाख ७५ हजार

.........

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत एकूण १२९९ आजारांवरील उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत नोंदणी करून या योजनेचा अधिकाधिक लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा.

- जयंती पटले, जिल्हा समन्वयक, राज्य आरोग्य हमी सोसायटी.

............