शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

बैठकी बाजार वसुलीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 9:36 PM

शहरातील बैठकी बाजार वसुलीच्या विषयाला स्थायी समितीच्या सभेत मंजुरी मिळाली. त्यामुळे शहरात आता कंत्राटदाराकडून बाजार वसुलीचा प्रयोग होणार हे स्पष्ट झाले आहे. यांतर्गत कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले असून करारही करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१६.५५ लाखांत लिलाव : कार्यादेश दिले, पालिकेचा करार झाला

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील बैठकी बाजार वसुलीच्या विषयाला स्थायी समितीच्या सभेत मंजुरी मिळाली. त्यामुळे शहरात आता कंत्राटदाराकडून बाजार वसुलीचा प्रयोग होणार हे स्पष्ट झाले आहे. यांतर्गत कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले असून करारही करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच बाजार वसुलीचा शुभारंभ होणार असल्याचे दिसून येत आहे.नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या पदग्रहण समारंभात बैठकी बाजार वसुली बंद करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून नगर परिषदेची बाजार वसुली बंद झाली होती. अशात नगर परिषदेला वार्षिक सुमारे सात लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागत होता. शिवाय नगर परिषद अधिनियमांत बाजार वसुली बंद केल्यास तेवढ्याच रकमेची पर्यायी व्यवस्था करावी असे नमूद आहे. यावर नगर परिषदेने बैठकी बाजार वसुलीसाठी १० मार्च रोजी निविदा काढली होती. या निविदेंतर्गत २६ तारखेला इ-लिलाव करणयात आला व त्यात इच्छूकांकडून आॅनलाईन बोली लावण्यात आली. यामध्ये शहरातील बजरीवाला बिल्डींग मटेरियल सप्लायर फर्मचे राजकुमार उमाशंकर पटले यांनी १६ लाख ५५ हजार रूपयांची महत्तम बोली लावली होती.दरम्यान बाजार वसुलीसाठीच्या दराला स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले. स्थायी समितीत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधीक सदस्य असल्याने बाजार वसुलीच्या विषयाला मंजुरी मिळाली. त्यामुळे संबंधीत कंत्राटदाराला बाजार वसुलीचे कंत्राट दिले जाणार हे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार नगर परिषदेने सोमवारी (दि.१६) कंत्राटदार पटले यांनी कार्यादेश दिला असून गुरूवारी (दि.१९) करार करण्यात आला आहे. म्हणजेच, नगर परिषदेकडून आवश्यक ती कारवाई करण्यात आली असून आता कंत्राटदार पटले कधीही बाजार वसुली सुरू करू शकतात.तीन टप्प्यात देणार पैसेबाजार वसुलीसाठी पटले यांनी १६.५५ लाखांची महत्तम बोली लावली होती. यामुळे त्यांनाच बाजार वसुलीचा कंत्राट दिला जाणार हे स्पष्ट होते. त्यामुळे पटले यांनी बोलीच्या १० टक्के म्हणजेच एक लाख ६५ रूपये नगर परिषदेत सुरक्षा ठेव जमा केले आहे. याशिवाय बोलीच्या रकमेच्या समान तीन भागात त्यांना नगर परिषदेला पैसे द्यावयाचे आहेत. यासाठी नगर परिषद त्यांच्याकडून तीन धनादेश घेणार आहे. तर कंत्राटदार पटले यांना १ जुले, १ आॅक्टोबर व १ जानेवारी रोजी नगर परिषदेत पैसे जमा करावयाचे आहेत.गरज पडल्यास आंदोलनाची तयारीकंत्राटी तत्वावर बाजार वसुलीचा कॉंग्रेस पक्षाकडून विरोध करण्यात आला आहे. यासाठी कॉंग्रेस पक्षातील नगरसेवकांनी जिल्हाधिकारी व आमदारांना निवेदन दिले होते. तसेच स्थायी समितीच्या सभेत कॉँग्रेसचे नगरसेवक व नगर परिषद गट नेता शकील मंसूरी, नगरसेवक सुनील तिवारी व आघाडीचे सदस्य सचिन शेंडे यांनी कंत्राटी बाजार वसुलीचा विरोधही केला होता. मात्र भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने स्थायी समितीच्या सभेत प्रस्ताव पारीत झाला. अशात कंत्राटी तत्वावर बाजार वसुली होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र यादरम्यान एखादी अप्रिय घटना घडल्यास त्याला नगर परिषद प्रशासन जबाबदार राहणार. तसेच गरज पडल्यास कॉँग्रेस पक्ष आंदोलन करणार असे गट नेता मंसूरी यांनी सांगीतले.३१ मार्चपर्यंतचे कंत्राटनगरपरिषदेने बाजार वसुलीसाठी टाकलेल्या निविदेतील अटी-शर्तीनुसार पटले यांना येत्या ३१ मार्चपर्यंतचा कंत्राट दिला जाणार आहे. या कालावधीत ते त्यांच्या करारातंर्गत येणाऱ्या व्यवसायीकांकडून वसुली करू शकतील. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत पटले यांना त्यांनी लावलेल्या बोलीची रक्कम काढावयाची आहे.