शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन नवीन अभ्यासक्रमांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:56 IST

येथील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमधील दोन नवीन अभ्यासक्रमांचा मार्ग आता मोकळा होणार आहे. कारण यासाठी लागणाऱ्या कॉलेज इमारतीमधील पहिल्या माळ्याच्या बांधकामासाठी ३.५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपॉलिटेक्निक कॉलेज : पहिल्या माळ्यासाठी ३.५० कोटंींचा निधी

आॅनलाईन लोकमतगोंदिया : येथील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमधील दोन नवीन अभ्यासक्रमांचा मार्ग आता मोकळा होणार आहे. कारण यासाठी लागणाऱ्या कॉलेज इमारतीमधील पहिल्या माळ्याच्या बांधकामासाठी ३.५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या येत्या पुरवणी बजेटमधून हा निधी मंजूर केला जाणार असून त्यानंतर १२ चौ.फुटाच्या पहिल्या माळ्याचे बांधकाम केले जाणार आहे.आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने गोंदियाला गव्हर्नमेंट पॉलीटेक्नीक कॉलेज लाभले व सन २०१३ मध्ये चार अभ्यासक्रम व २४० विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊन कॉलेज सुरू करण्यात आले होते. कॉलेज इमारतीसाठी आमदार अग्रवाल यांनी फुलचूरपेठ येथे शासकीय जमीन व २० कोटींचा निधी मंजूर करविला होता. पहिल्या वर्षी चार अभ्यासक्रम व २४० विद्यार्थी असतानाच सन २०१४ मध्ये सिव्हील व इलेक्ट्रीकल हे दोन अतिरीक्त अभ्यासक्रम आमदार अग्रवाल यांनी मंजूर करवून घेतले. परिणामी प्रत्येक वर्षी २४० ऐवजी ३६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू लागला व या ३६० जागांमधील एकूण ७० टक्के म्हणजेच २५२ जागा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षीत करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगारान्मुख शिक्षण मिळावे यासाठी आमदार अग्रवाल आणखी दोन अभ्यासक्रम सुरू करविण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र कॉलेज इमारतीत जागा नसल्याने त्यांना यात अडचण येत होती. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी आमदार अग्रवाल यांनी इमारतीच्या पहिल्या माळ््याच्या बांधकामासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे २० जून रोजी बांधकामाला मंजूरी मिळाली.मात्र निधीसाठी काम अडून पडल्याने आमदार अग्रवाल यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. परिणामी पहिल्या माळ््याच्या बांधकामासाठी राज्याच्या पुरक बजटमध्ये ३.५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून वितरीत केला जाणार आहे.यामुळे कॉलेज इमारतीतील १२ चौ.फूट जागेत पहिल्या माळ््याचे बांधकाम होणार. तसेच दोन नवे अभ्यासक्रम येणार असल्याने आणखी १२० विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश देता येणार आहे.