रूग्ण सेवा-ईश्वर सेवा : जडीबुटी, झाड-पत्ती वनस्पती औषधाची किमयाबाराभाटी : ग्रामीण भागातही खासगी दवाखाने, शासकीय ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. अनेक जीवघेण्या आजारांवर नियंत्रणही मिळविले जाते. अशातही ग्रामीण परिसरात निसर्गातील झाडपत्ती औषध आणून तब्बल २० वर्षांपासून रूग्णांवर मोफत औषधोपचार करून रूग्ण सेवा करणाऱ्या डॉ. हरिदास कुंभरे यांच्या प्रयत्नांना तोड नाही.अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या बाराभाटी-येरंडी येथील डॉ. हरिदास दुर्वाजी कुंभरे हे स्वत: घरीच वनपरिक्षेत्रातून झाडपत्ती वनस्पती औषधी आणतात. सदर औषधापासून सर्वसामान्य लोकांवर मोफत उपचार करून वात, संधिवात, लकवा, भगंदर, मूळव्याध, गुट, डाग आदी अनेक आजार बरे करतात. त्यामुळे लोकांचे जीवन निरोग व निर्मल राहण्यास मदत होते.आपले उपचार करून घेण्यासाठी व सदर मोफत वनस्पतीजन्य औषधी मिळवून घेण्यासाठी गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर तसेच छत्तीसगडच्या रायपूर, डोंगरगड व मध्यप्रदेश अशा अनेक ठिकाणातून अनेक रूग्ण येतात. रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या मूलमंत्रातू डॉ. कुंभरे सदर उपक्रमच राबवित आहेत. झाडपत्ती औषधाची किमया त्यांना न्यारीच जमल्याचे बोलले जाते.हे परिसरच निसर्गरम्य असून येथे राहणारे डॉ. कुंभरे आदिवासी असून त्यांना अनेक वृक्षांची, जडीबुटींची व वलींची ओळख आहे. मानवाच्या कोणत्या आजारावर कोणत्या वृक्षाचा कोणता भाग उपयोगी ठरतो, याची त्यांना उत्तम जाण व समझ आहे. त्यामुळेच ते तब्बल २० वर्षांपासून मोफत औषधोपचार करीत आहेत. त्यांच्यासह त्यांच्या मार्गदर्शनात रूपचंद लंजे, सदाशिव कुंभरे, दादाजी कुंभरे, रामेश्वर राऊत, प्रमोद कोवे आदी लोकांची चमू ग्रामीण भागात विनामूल्य लोकांचा उपचार करीत आहे. रूग्ण सेवा करणे हेच आमचे मुख्य उद्देश्य असल्याचे डॉ. कुंभरे यांनी सांगितले. (वार्ताहर)
तब्बल २० वर्षांपासून मोफत औषधोपचार
By admin | Updated: February 9, 2015 23:16 IST