शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:07 IST

बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार वंचीत व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे.

ठळक मुद्देआरटीई २५ टक्के प्रवेश : एक लाखाच्या आत उत्पन्नाची अट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार वंचीत व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. पुढील शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील १ हजार बालकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यांची आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.२५ टक्के मोफत प्रवेशाकरीता पात्र पाल्यांच्या पालकांनी आॅनलाईन प्रवेश नोंदणी करायची आहे. पालकांना प्रवेश नोंदणी करताना १ किमी, ३ किमी व त्यापेक्षा अधिक अंतरातील केवळ १० शाळा निवडता येतील. परंतु प्रवेश एकच शाळेत मिळणार आहे. ठरावीक वेळेत पालकाने आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित करने आवश्यक आहे. अन्यथा पुढच्या फेरीत त्या पाल्याचा विचार केला जाणार नाही. कोणत्याही सबळ कारणाशिवाय शाळेत प्रवेश नाकारता येणार नाही. प्रवेश नाकारणाऱ्या शाळेवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ३० सप्टेंबर २०१८ रोजी विद्यार्थ्याचे कमीत कमी कय ५ वर्ष ८ महिने पूर्ण असावे ६ वर्ष ११ महिने २९ दिवसापेक्षा अधिक असू नये. पालकांनी विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी करताना कोणतेही कागदपत्रे अपलोड करु नये. मात्र उत्पन्नाच्या दाखल्यामधील बारकोड अर्जात नमूद करावे. विद्यार्थ्याला आॅनलाईन प्रवेश मिळाल्यानंतर तसा एसएमएस शाळा व पालकांना पाठविण्यात येईल. पालकांचे सुरु असलेले मोबाईल क्रमांक प्रवेश नोंदणी करताना नमूद करने आवश्यक आहे.प्रवेशासाठी पाच कागदपत्रेजन्माचा प्रमाणपत्र, वास्तव्याचा पुरावा, सामाजिक वंचित घटकातील पालकांचा जातीचा दाखला आवश्यक आहे. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे २०१६-१७ चे उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असावे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० टक्यापेक्षा जास्त अपंगत्व असावे. घटस्फोटीत महिला, विधवा महिला यांची बालके, अनाथ बालके, दिव्यांग बालके यांच्या बाबतीतही सदर कागदपत्रे आवश्यक राहतील.घटस्फोटीत विधवा महिलांची मुले व अनाथ बालकेन्यायालयाच्या निर्णयाने घटस्फोटीत असलेल्या महिलेचा रहिवासी पुरावा. बालक वंचित गटातील असल्याचे किंवा वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला, विधवा महिलांसाठी त्यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचा किंवा वडिलाचा जातीचा प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास आईच्या उत्पन्नाचा दाखला, अनाथ बालकांसाठी अनाथालयातील कागदपत्रे, अनाथालयात नसल्यास जे पालक सांभाळतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहणार आहे.गट साधन केंद्रात तक्रार निवारणआरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशा संदर्भात कुणालाही मदत किंवा तक्रार करायची असल्यास गटसाधन केंद्रात संपर्क साधता येईल. वेळेच्या आत पालकांनी नोंदणी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम.आर. दयानिधी व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी सांगितले.