शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या मृतदेहासह गावात पोहचले १४ युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : तालुक्यातील ग्राम परसोडीटोला येथील काही युवक मजुरीच्या कामासाठी आंध्रप्रदेशात गेले होते. मात्र, कोरोनाच्या पाशर््वभूमीवर ...

ठळक मुद्देरोजगारासाठी गेले होते आंध्रप्रदेशात : गावाकडे परतताना झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील ग्राम परसोडीटोला येथील काही युवक मजुरीच्या कामासाठी आंध्रप्रदेशात गेले होते. मात्र, कोरोनाच्या पाशर््वभूमीवर देशात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे ते युवक पायी प्रवास करीत गावाकडे निघाले. काही अंतरावर एक टँकर मिळाल्याने त्या माध्यमातून प्रवास करीत होते. त्यातच टँकरचा अपघात झाल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर १४ युवक जखमी झाले. सर्व जखमींना आंध्रप्रदेशातील रूग्णालयात दाखल करण्यात आले.रविवारी (दि.१९) रोजी त्यांना रूग्णालयातून सुटी देऊन रूग्णवाहिकेच्या माध्यमातून गोरेगाव तालुक्यातील परसोडीटोला गावात सोडण्यात आले. दरम्यान एका युवकाच्या मृतदेहासह १४ युवक गावात पोहोचताच परिसरात शोककळा पसरली.गोरेगाव तालुक्यातील काही युवक मजुरीच्या कामासाठी आंध्रप्रदेश राज्यात गेले होते. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे ते युवक तिथेच अडकून पडले.१५ एप्रिलनंतर मुभा मिळेल, या आशेवर कंत्राटदाराच्या आश्रयाखाली ते तिथेच थांबले होते. मात्र, १५ एप्रिलनंतर संचारबंदीत वाढ झाल्याने ते १५ युवक गावी येण्यासाठी पायीच निघाले. काही अंतरावर आल्यानंतर एक टँकर चालकाने त्यांना मदत केली. सर्व युवक टँकरमध्ये बसून येत असताना टँकरचा अपघात झाला. या घटनेत राजेश प्रेमलाल ऊईके रा.परसोडीटोला या युवकाचा मृत्यू झाला. तर इतर चौदा जण जखमी झाले.सर्व जखमींना उपचारासाठी हैदराबाद येथे पुन्हा दाखल करण्यात आले. रूग्णालयातून सुटी झाल्यानंतर १४ युवकांना राजेशच्या मृतदेहासह रूग्णवाहिकेने गोरेगाव येथील परसोडीटोला येथे पाठविण्यात आले. ते १४ युवक मृतदेहासह गावात पोहोचताच शोककळा पसरली. लॉकडाऊनमुळे बाहेर राज्यात आणि जिल्ह्यात अडकलेल्यांचे प्रचंड हाल होत असल्याने ते मिळेल त्या साधनाने अथवा पायीच आपल्या गावाकडे परतत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAccidentअपघात