दोघे सुखरूप : जयवंताला पुष्पगुच्छ देवून सुटीगोंदिया : बाई गंगाबाई महिला रूग्णालयात चार मुलांना जन्म देणाऱ्या जयवंता कोहरे या महिलेला शुक्रवारी (दि.१२) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवी धकाते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सुटी देण्यात आली. जयवंताची प्रसूती २८ एप्रिल रोजी झाली होती.गोरेगाव तालुक्याच्या तुमखेडा येथील रहिवासी जयवंता कोहरे यांना प्रसूतीसाठी गंगाबाई रूग्णालयात २८ एप्रिल रोजी भरती करण्यात आले होते. तेथे तिने त्याच दिवशी तीन मुलांना व एका मुली जन्म दिला. सर्व बालकांचा जन्म सहा-सहा मिनिटांच्या अंतरात झाला होता. यापैकी ४५० ग्रॅम वजनाच्या बालकाने पाचव्या तर ७५० ग्रॅम वजनाच्या बालकाने २० व्या दिवशी रूग्णालयाच्या नवजात शिशू चिकित्सा कक्षात (एनआयसीयूमध्ये) मृत्यू झाला होता. जन्माच्या वेळी तिसऱ्या बालकाचे वजन ११९० ग्रॅम तर चौथ्या मुलीचे वजन ९७५ ग्रॅम होते. या दोघांचा सद्यस्थितीत वजन क्रमश: १,४०० ग्रॅम व १,२०० ग्रॅम असून ते धोक्याबाहेर आहेत. दोन्ही बालकांना रूग्णालयाच्या एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. शुक्रवारी रूग्णालयात दीड महिना पूर्ण झाल्यावर जयवंता व तिच्या दोन्ही बालकांना डिस्चार्ज करण्यात आले. या वेळी बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश लाटणे, डॉ. संजीव दोडके, डॉ. अमरीश मोहबे, इतर डॉक्टर व परिचारिकांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी पुष्पगुच्छ देवून तिला निरोप दिला. (प्रतिनिधी)
तुमखेड्याच्या महिलेने दिला चार मुलांना जन्म
By admin | Updated: June 13, 2015 00:53 IST