गोंदिया : गणेशनगर, रेव्हेन्यू कॉलनी येथे दोन आरोपींनी संगनमत करून सागर सुभाष बनाकर यांच्या घरी जाऊन तू माझ्या पत्नीला का बोललास, असे म्हणून त्यांच्या डोक्यावर लाकडी स्टंपने मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून त्यांच्या भावाच्या चारचाकी गाडीला आग लावून नुकसान केले. ही घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजता घडली. सागर बनाकर यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ४५२, ४३५, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलीस हवालदार मलेवार करीत आहेत.
चारचाकी वाहनाला लावली आग
By admin | Updated: May 7, 2016 01:46 IST