शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चार मार्गावर मानवविकासच्या बसफेºया बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 21:14 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावापासून शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी शासनाच्या मानवविकास कार्यक्रमातंर्गत बसफेºया सुरू करण्यात आल्या.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची गैरसोय : खराब रस्त्यांमुळे अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावापासून शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी शासनाच्या मानवविकास कार्यक्रमातंर्गत बसफेºया सुरू करण्यात आल्या. मात्र खराब रस्त्यांमुळे चार मार्गावरील मानव विकासच्या बसफेºया बंद असल्याने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.गोंदिया आगारात एकूण ९६ बसेस आहेत. यापैकी मानव विकास कार्यक्रमांतर्गत २८ स्कूल बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या. प्रत्येक तालुक्यासाठी सात यानुसार चार तालुक्यांसाठी या २८ स्कूल बसेस आहेत. यात गोंदिया, गोरेगाव, आमगाव व सालेकसा या तालुक्यांचा समावेश आहे. चारही तालुक्यांत स्कूल बसेससाठी मार्ग निश्चित करुन दिले आहे. जुलै ते एप्रिल महिन्यापर्यंत शाळा सुरू असताना या बसेस स्कूल बसेस म्हणून धावतात. त्यानंतर त्यांना तीन महिन्यांसाठी प्रवासी सेवेत त्यांचा उपयोग केला जातो. चार तालुक्यातील काही रस्ते पूर्णत: उखडले आहेत. त्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचते व परिणामी वाहतूक ठप्प होते. शिवाय पाऊस आल्यावर काही रस्ते बाधित होतात. त्यामुळे स्कूल बसेसचा प्रवास अर्धवटच होतो.पाऊस आल्यावर किन्ही-डांगोर्ली-किन्ही मार्गाची स्कूल बस जात नाही. तर बिरसोला व भाद््याटोला बसेसला अर्धवटच प्रवास करून परतावे लागते. तर नान्हाटोला येथे जाणारी स्कूल बस जेथपर्यंत रस्ता चांगला आहे तिथपर्यंत जाऊन परत येते. बस फेºया बंद असल्याने विद्यार्थिनींच्या शैक्षणिक कार्यात अडचणी येत शैक्षणिक नुकसान होत आहे.रस्ते दुरूस्तीसाठी सर्वेक्षणाची गरजगोंदिया आगारांतर्गत धावणाºया बसेसचा प्रवास थांबला की त्या दिवशी होणाºया उत्पन्नावर फरक पडतो. शिवाय स्कूल बसेसचा प्रवास प्रभावित झाला की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे सदर मार्गाचे निरीक्षण करून रस्त्यांची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. या रस्त्यांच्या दुरूस्तीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडणार नाही व नियमित शाळेत येवू शकतील.