शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:04 IST

ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी प्रत्येक गावाला त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना दिली जात आहे.

ठळक मुद्देपाणी पेटणार : उन्हाळ््यापूर्वी तोडगा काढण्याची गरज

कपिल केकत।आॅनलाईन लोकमतगोंदिया : ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी प्रत्येक गावाला त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना दिली जात आहे. या योजनांतून गाव आपली तहान भागवित असून या योजना गावकऱ्यांसाठी वरदान ठरतात. असे असताना मात्र जिल्ह्यातील चार योजना बंद असल्याची माहिती आहे. लवकरच या योजना सुरू न झाल्यास येणाºया काळात या गावांत पाणी पेटणार असल्याची चिन्हे दिसून येत असून गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे येणाऱ्या काळात पाणी टंचाईचे सावट दिसून येत आहेत. अशात ग्रामीण भागात पाणी पेट घेऊन ग्रामीणांची पाण्यासाठी भटकंती होते. पाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची भटकंती होऊ नये यासाठी शासनाकडून प्रत्येकच गावाला त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना दिली जात आहे. या योजनेतून त्या गावाला पाणी पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबत आहे.जिल्ह्यात आजघडीला ३२१ पाणी पुरवठा योजना असून यांच्या माध्यमातून गावांना पाणी पुरवठा होतो. शिवाय गरजेनुसार अन्य काही योजनांचे काम सुरू आहे. या पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी मिळत असल्यामुळे गावकºयांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ येत नाही.योजनांत काही बिघाड आल्यास किंवा काही अन्य कारणांमुळे योजना बंद पडल्यास गावात हडकंप माजतो. पाणी न मिळाल्यास गावकºयांना पाण्यासाठी अन्य साधनांवर अवलंबून रहावे लागते. मात्र उन्हाळ््यात अन्य साधनांनीही साथ सोडल्यास पाणी पेट घेऊन त्या गावांत हाहाकार माजतो.आता दोन महिन्यांवर उन्हाळा आला असून यंदा उन्हाळ््यात पाणी टंचाईची पूर्ण चिन्हे दिसून येत आहेत. असे असताना मात्र, जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील ग्राम देवरी, सालेकसा तालुक्यातील ग्राम कावराबांध, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम गौरनगर व कोरंभीटोला येथील पाणी पुरवठा योजना बंद पडून आहे. यंदा आतापासूनच नदी, नाले व तलावांत ठणठणाट असताना भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावत चालली आहे. अशात उन्हाळ््यात या चार गावांत पाणी पेटणार यात मात्र शंका वाटत नाही.देखभाल-दुरूस्तीचा अभावजिल्ह्यातील ९ योजनांना वीज जोडणी न मिळाल्यामुळे त्या बंद पडून आहेत. मात्र देवरी, कावराबांध, गौरनगर व कोरंभीटोला येथील या योजनांना देखभाल-दुरूस्तीतील अभावाचा फटका बसला असल्याची माहिती आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून योजना तयार झाल्यानंतर ग्रामपंचायतला हस्तांतरीत केली जाते. त्यानंतर संबंधीत ग्रामपंचायतला योजनेची देखभाल-दुरूस्ती करावी लागते. यासाठी पाणीपट्टी गोळा करून योजनेसाठी येणारे खर्च करावे लागतात. मात्र बहुतांश वेळी विजेचे बील न भरण्याचे प्रकार पुढे येतात. शिवाय अन्य काही कारणांमुळेही योजना बंद पडतात. या चार योजनांनाही यातीलच काही प्रकारांचा फटका बसला आहे.