शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

विभागीय आयुक्तांची चार पत्रे दडवून ठेवली

By admin | Updated: September 29, 2016 00:26 IST

तिरोडा तालुक्यातील शिक्षक नेतराम माने यांच्या निलंबन प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्त नागपूर यांनी चार पत्र पाठवून मागितला.

सहायक प्रशासन अधिकाऱ्याचा प्रताप : शिक्षक नेतराम माने निलंबन प्रकरणगोंदिया : तिरोडा तालुक्यातील शिक्षक नेतराम माने यांच्या निलंबन प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्त नागपूर यांनी चार पत्र पाठवून मागितला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे असलेले पत्र सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व अकार्यकारी पदावर कार्यरत सहायक प्रशासन अधिकारी दिवाकर खोब्रागडे यांनी सात महिने दडवून ठेवले. तसेच विभागीय चौकशीसंबंधी अहवालसुद्धा शिक्षण विभागाने दोन महिने दडवून ठेवल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे.शिक्षक माने निलंबन प्रकरणाबाबत विभागीय आयुक्त नागपूर विभाग यांनी (विशा/कार्या-११(५)/कावि ५४६/११४६/२०१५ दिनांक २८ सप्टेंबर २०१५), (२८ नोव्हेंबर २०१५), (कार्या-११(५)/कावि-१४७६/२०१५ दिनांक १९ डिसेंबर २०१५) व चौथे स्मरण पत्र (कार्या-११(५) कावि-१४०/२२३/२०१६ दिनांक १७ फेब्रुवारी २०१६) अशी पत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांच्या नावे पाठवून तत्काळ चौकशी करून अहवाल मागितले होते. मात्र या सर्व पत्रांकडे दुर्लक्ष करण्यात आले. विभागीय आयुक्तांनी तीन पत्रे पाठविले. तरी चौथे स्मरणपत्र दाखविले. हे चारही पत्र साप्रविचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम, वरिष्ठ सहायक लिचडे व शिक्षण विभागाचे अकार्यकारी अधिकारी दिवाकर खोब्रागडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूण दिले नाही. द्वेषभावनेतून आपल्याजवळ दडवून ठेवले. शेवटचे स्मरणपत्र सहायक प्रशासन अधिकारी दिवाकर टी. खोब्रागडे यांनी तीन महिने दडवून ठेवले. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, श्याम लिचडे व शिक्षणाधिकारी यांच्या सांगण्यावरून विलंब होत असल्याचे खोब्रागडेंचे म्हणणे आहे.विभागीय आयुक्तांनी ३ एप्रिल २०१६ रोजी नेतराम माने यांच्या संपूर्ण प्रकरणाची फाईल घेवून उपस्थित राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्यामार्फत अकार्यकारी अधिकारी दिवाकर खोब्रागडे व वरिष्ठ सहायक गुलाब उपस्थित झाले. त्यावेळी विभागीय आयुक्तांनी चांगलेच फटकारले. विभागीय चौकशीला विलंब झाल्याचे सांगून तात्काळ करण्याचे आदेश दिले. विभागीय कारवाई करण्याबाबत तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यासंबंधी पत्र (विशा/कार्या-११(५)/कावि-५७६/२०१६, दिनांक १० मे २०१६) रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देण्यात आले. या पत्रालासुद्धा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूण न देता साप्रविचे वरिष्ठ सहायक लिचडे व अकार्यकारी अधिकारी दिवाकर खोब्रागडे यांनी दडवूनच ठेवले. विभागीय चौकशीसंबंधी एक ते चार निवेदन पत्र (१३/३/१६ दिनांक २७ मे २०१६) नुसार शिक्षक माने यांना देण्यात आले. माने यांनी आपले मत १५ जून २०१६ ला सादर केले. याचा अहवाल जूनच्या अखेर विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे पाठविणे आवश्यक होते. तो अहवाल शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहायक गुलाब मेश्राम यांनी वेळेत तयार केले व अकार्यकारी अधिकारी खोब्रागडे यांना सादर केले. परंतु काही ना काही कारणे समोर करून यालासुद्धा दडवून ठेवण्यात आले. त्यामुळे सदर प्रकरण लांबणीवर जात आहे. (प्रतिनिधी)अपील सुनावणीचे पत्रही दडविलेअप्पर आयुक्त नागपूर विभाग यांच्याकडे शिक्षक नेतराम माने यांनी उशिरा अपिल (क्र.१४१/२०१५-१६) दाखल केली. अपिलाच्या सुनावनीसाठी (विशा/कार्या ११/(२)/कावि/४११/३९६/२०१६ दिनांक ४ जून २०१६) नुसार निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देवून २१ जून २०१६ ला मूळ अभिलेख परिच्छेदनिहाय उत्तरासह आयुक्त कार्यालयात न चुकता हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. २१ जून २०१६ रोजी सुनावनीकरिता इतिवृत्त वरिष्ठ सहायक गुलाब मेश्राम यांनी तयार केले. (जिपगो/शि/प्रा/विचौ/वस/डे-९/वशि/१७१५/१६) जि.प. गोंदियाला १२ जुलै २०१६ ला पाठविण्याकरिता दिले. मात्र हे इतिवृत्त अकार्यकारी अधिकारी खोब्रागडे यांनी दडपणाखाली आपल्याजवळ दडवून ठेवले.अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून रोखलेअकार्यकारी सहायक प्रशासन अधिकारी दिवाकर खोब्रागडे यांच्यामुळे स्वच्छ प्रतिमेच्या व चांगल्या अधिकाऱ्यांना बदनाम व्हावे लागले आहे. या प्रकरणाबाबत जि.प. सदस्य मनोज डोंगरे व इतरांनी पत्र न पाठविण्यामागे अडचण कसली, अशी विचारणा केली. तेव्हा यात आपली चूक नसून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकारी व सहायक तसेच एका पदाधिकाऱ्याच्या बोलण्यावर आपण थांबविले असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांनी फटकारल्यानंतर २६ आॅगस्ट २०१६ रोजी सहायक मेश्राम यांच्या हातून अप्पर आयुक्ताकडे पाठविण्यात आले.