शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

हंडाभर पाण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात चार कि.मी.ची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 14:54 IST

अख्खं आयुष्य सरले, पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय, सरकारला आम्हा अतिदुर्गम भागातील नागरिकांची केव्हा कीव येणार, अन् आमच्या डोईवरचा हंडा केव्हा खाली येणार? हे शब्द आहेत गोरेगाव तालुक्याच्या पूर्व दिशेला वसलेल्या गौरीटोला या अतिदुर्गम गावातील महिलांचे.

ठळक मुद्देशेतातील विहिरींचा आधारपाणी पुरवठा योजनेचा अभाव

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अख्खं आयुष्य सरले, पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय, सरकारला आम्हा अतिदुर्गम भागातील नागरिकांची केव्हा कीव येणार, अन् आमच्या डोईवरचा हंडा केव्हा खाली येणार? हे शब्द आहेत गोरेगाव तालुक्याच्या पूर्व दिशेला वसलेल्या गौरीटोला या अतिदुर्गम गावातील महिलांचे. मागील पाच महिन्यापासून या गावातील महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. शेतातील विहिरी आणि बोअरवेलचे पाणी आणून येथील गावकरी आपली तहान भागवित असल्याचे चित्र आहे.गोरेगाव तालुक्यातील गौरीटोला हे गाव. या गावाला जाण्यासाठी दोन वर्षापूर्वी साधे रस्तेही नव्हते. रस्ते झाले असले तरी येथील पाण्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे.मागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने आणि परिसरातील तलाव आणि सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्याने जानेवारी महिन्यापासून गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सातशे लोकसंख्या असलेल्या या गावात खासगी १२ विहिरी व ५ बोअरवेल आहेत. मात्र विहिरींना जानेवारी महिन्यापासूनच पाणी नाही तर बोअरवेलनी सुध्दा तळ गाठला आहे. आता शेतातील बोअरवेल आणि विहिरीचे पाणी आणून कसाबसा उन्हाळा काढायचे असे धोरण गावकऱ्यांनी अवलंबविले आहे. येथील पाणी टंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी गावातील महिलांना तीन ते चार किमी पायपीट करावी लागत आहे. मागील पाच महिन्यांपासून येथील गावकºयांची पाण्यासाठी पायपीट कायम आहे. तर तापमानात सुध्दा सातत्याने वाढ होत असल्याने हळूहळू शेतातील विहिरींनी सुध्दा तळ गाठण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात पाऊस न झाल्यास ही समस्या पुन्हा गंभीर होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईचा विचार करुनच गावकºयांची झोप उडत असल्याचे चित्र आहे. तिल्ली ग्रामपंचायत अधिनस्थ गौरीटोला हे गाव येते.मात्र येथील लोकांना भौतिक सुविधांचाही दुष्काळ आहे. दुष्काळाच्या झळांनी कोरड्या पडणाऱ्या घशाची तहान भागविण्यासाठी प्रशासन कधी जागेल असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत.सहा बोअरवेल व एक विहीरगौरीटोला येथे शासनाने ६ बोअरवेल व एक विहीर तयार केली आहे. वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या या विहिरीला थोडेफार पाणी आहे. पण बोअरवेलची बिकट स्थिती आहे. या बोअरवेलमधून पिण्यायोग्य पाणी येत नाही, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे.

गावात पाणी पुरवठ्याची साधने अपुरी असल्याने दरवर्षी गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र मागील पंधरा वीस वर्षांत यंदा प्रथमच पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली. मागील पाच महिन्यापासून आम्ही शेतातील विहिरीचे पाणी आणून तहान भागवित आहोत.-भिमराज चौरागडे, गावकरी, गौरीेटोला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई