शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:17 IST

जिल्ह्यातील रेतीघाटांचे अद्यापही लिलाव झालेले नसताना तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करुन त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल व पोलीस विभागाला मिळाली.

ठळक मुद्देमहसूल व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई : साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील रेतीघाटांचे अद्यापही लिलाव झालेले नसताना तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करुन त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल व पोलीस विभागाला मिळाली. त्यानंतर गुरूवारी (दि.२२) या दोन्ही विभागाच्या संयुक्त पथकाने धाड टाकून डांर्गोली नदीघाटावरुन साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. रेतीचा अवैध साठा करणाऱ्या ट्रॅक्टर चालक व मालकाविरुध्द रावणवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, तहसीलदार राहुल सारंग, रावणवाडीचे पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर, मंडळ अधिकारी प्रकाश तिवारी, तलाठी, देवेंद्र भगत, धन्नुलाल मडावी, बिहारीलाल बिसेन,अमित बडोले, अव्वल कारकून आशिष रामटेके, पोलीस शिपाई उमाळे,नंदेश्वर यांच्या पथकाने ही कारवाई केली. २२ नोव्हेंबरला रात्री २ वाजताच्या सुमारास या दोन्ही विभागाचे पथक डांर्गोली येथील वैनगंगा नदीच्या पात्र परिसरात पॅट्रोलिंग करीत होते. दरम्यान नदीपात्रात रेतीचे उत्खनन करुन त्याची ट्रॅक्टरव्दारे वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले.पथकातील कर्मचाºयांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता एक ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरसह घटनास्थळावरुन पसारा झाला. तर तीन ट्रॅक्टर चालक घटनास्थळीच उपस्थित होते. त्यांचे बयाण नोंदविण्यात आले. घटनास्थळावरुन पोलिसांनी एमएच ३५, झेड ८६६४ होडां कंपनीची ड्रीम निओ व एम एच ३५ यु.२५४९ बजाज कंपनीची डिस्कवर या दोन मोटारसायकल जप्त केल्या. टॅÑक्टरने पळून गेलेल्या चालकाच्या खिशातून पडलेल्या दुचाकीचे नोंदणी बुक व ५ हजार किमतीचा मोबाईल जप्त केला. घटनास्थळावरील शिवशंकर लिल्हारे या व्यक्तीकडे हिरव्या रंगाची नोंदवही आढळली. सदर नोंदवहीत रेतीसाठ्याच्या नोंदी आढळून आल्या. त्याचप्रमाणे नदीपात्रालगत असलेल्या सोनुदेव पहाडीजवळील शासकीय जागेत अंदाजे ३० ब्रास रेतीचा अवैधरित्या केलेला साठा आढळून आला.यामोहिमेदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या टॅÑक्टरमध्ये एमएच ३५, जी.५६३१ व ट्राली एफ १५१०,एमएच ३५ एजी २९८२, ट्राली एफ १८९६,एमएच ३५ जी. ५२२२ ट्राली एफ. ३५८८ हे जप्त करण्यात आले. रेतीसह ७ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.नोंदवहीतील नोंदीप्रमाणे अवैधरित्या रेतीचा साठा केल्याप्रकरणी ट्रक्टर चालक व मालकाविरु ध्द रावणवाडी पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी प्रकाश तिवारी यांनी लेखी तक्र ार नोंदविली आहे.

टॅग्स :sandवाळू