शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

साडेचार एकरातील उभे धानपीक जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 21:56 IST

यंदा पावसाने पाठ फिरविल्याने रोवणी लांबली होती. त्यातच धानपीक ऐन कापणीच्या हंगामात असताना त्यावर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने धानाची पूर्णत: तणस झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : धानोली येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : यंदा पावसाने पाठ फिरविल्याने रोवणी लांबली होती. त्यातच धानपीक ऐन कापणीच्या हंगामात असताना त्यावर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने धानाची पूर्णत: तणस झाली आहे. धानपिकांवरील कीडरोगांनी त्रस्त झालेल्या दोन शेतकºयांनी साडेचार एकरातील उभे धानाचे पीक जाळले. ही घटना रविवारी (दि.१२) तालुक्यातील धानोली येथे घडली. या घटनेमुळे तालुक्यातील शेतकºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.दुर्योधन मनीराम गौतम व जयराम शिवशंकर कटरे, रा.धानोली अशी कीडरोग आणि नैसर्गिक संकटांना कंटाळून शेतातील धान पिकाला आग लावणाºया शेतकºयांची नावे आहेत. दुर्योधन गौतम यांनी अडीच एकरातील तर जयराम कटरे यांनी दोन एकरमधील धानपीक जाळून टाकले. यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने बºयाच शेतकºयांना रोवणी करता आली नाही. तर काही शेतकºयांनी उपलब्ध सिंचनाच्या सोयीच्या मदतीने कशी बशी रोवणी आटोपली. मात्र कीडरोगांमुळे हाती आलेले पीक गमविण्याची वेळ शेतकºयांवर आली. त्यामुळे शेतकरी नैराश्यात आहे. हजारो रुपयांचा लागवड खर्च करुनही काहीच हाती लागण्याची शक्यता कमी आहे. यामुळेच या दोन शेतकºयांनी शेतातील उभे धानपीक जाळल्याचे बोलल्या जाते. ही केवळ या दोन शेतकºयांची व्यथा नसून तालुक्यातील अनेक शेतकºयांची हीच स्थिती आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी, धानोली, बोळुंदा, थाडेझरी, बेहळीटोला या गावातील शेतकºयांनी ५० टक्के धानाची रोवणी केली नाही. केवळ ज्यांच्याकडे सिंचनाची सोय होती. अशाच शेतकºयांनी इतर शेतकºयांना मदत करुन धानाची लागवड केली.पंचनामे करुन नुकसान भरपाई द्याधानोरी येथील ७०० एकर शेतीपैकी केवळ १२५ एकरवर धानाची लागवड करण्यात आली. थाडेझरी येथील २५० एकर शेतजमीन असून केवळ १० एकरात धानपिकाची लागवड करण्यात आली. शेतकºयांनी काढलेल्या पीक विम्याचाही फायदा शेतकºयांना मिळाला नाही. तसेच नुकसान भरपाई देखील मिळाली नाही. प्रशासनाने पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.