शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चार तांबा चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:25 IST

आॅनलाईन लोकमतगोंदिया : रेल्वेच्या इलेक्ट्रीक लोको इंजिनमधून तांबा चोरी करणाºया चार आरोपी व तांबा खरेदी करणाऱ्या दुकानदाराला रेल्वे सुरक्षा दलाने अवघ्या १२ तासांत अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.७) दुपारी १२ वाजता करण्यात आली.शनिवारी (दि.६) रेल्वेच्या येथील लोको इलेक्ट्रीक इंजिनमधील इंजिनचे प्रेशर मेंटेन करणारे तांब्याचे तार चोरट्यांनी पळविले होते. १९ हजार ...

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दलाची कारवाई : खरेदी करणारा दुकानदारही अडकला

आॅनलाईन लोकमतगोंदिया : रेल्वेच्या इलेक्ट्रीक लोको इंजिनमधून तांबा चोरी करणाºया चार आरोपी व तांबा खरेदी करणाऱ्या दुकानदाराला रेल्वे सुरक्षा दलाने अवघ्या १२ तासांत अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.७) दुपारी १२ वाजता करण्यात आली.शनिवारी (दि.६) रेल्वेच्या येथील लोको इलेक्ट्रीक इंजिनमधील इंजिनचे प्रेशर मेंटेन करणारे तांब्याचे तार चोरट्यांनी पळविले होते. १९ हजार २०० रूपये किंमतीचे हे तार चोरट्यांनी नगर परिषद कार्यालयासमोरील लक्ष्मी बर्तन भंडारचे रायजी नारायण जोशी (४८, रा.गणेशनगर) यांना विकले होते.या चोरीची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून माहिती मिळविली. तसेच आपली तपासचक्रे फिरवून अवघ्या १२ तासांच्या आत चार चोर व चोरीचा तांबा खरेदी करणाºया दुकानदारास अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला १९ हजार २०० रूपये किंमतीचा तांबा जप्त केला.या प्रकरणातील चारही आरोपी सिंगलटोली गोंदिया येथील रहिवासी असून यात तीन बाल आरोपी तर चौथा आकाश रमेश श्रीवास (२२,रा.सिंगलटोली) हा तरूण आहे. रेल्वे संपत्ती अवैध कब्जा अधिनियमाच्या कलम ३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्याचे दपूम रेल्वेचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे व पोलीस निरीक्षक सिंग यांनी सांगीतले.टास्क टीमने पकडली आंतरराज्यीय चोरांची टोळीमहाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड व उत्तरप्रदेश या राज्यांत रेल्वे प्रवासात व स्थानकांवर चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला रेल्वे सुरक्षा दलाच्या टास्क टीमने अटक केली. विशेष म्हणजे, सदर टोळी मागील अडीज वर्षांपासून रेल्वे प्रवासात खिसे कापणे, प्रवाशांचे मोबाईल पळविणे, तिकीट काढून प्रवास करून प्रवाशांमध्ये मिसळणे व प्रवासी महिलांच्या बॅगमधून रक्कम तसेच दागिने पळविणे अशा अनेक घटना घडविण्यात सक्रीय होती. टास्क टीम मागील तीन दिवसांपासून मोबाईल ट्रॅकिंग व सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण करीत होती. त्यातूनच सदर टोळी उघडकीस आली. या टोळीकडून गोंदियाच्या रेल्वे सुरक्षा दलाला १५० ते २०० रेल्वे प्रवासाच्या जुन्या तिकिटासुद्धा आढळल्या. तसेच रेल्वे सुरक्षा दलाने त्यांच्याकडून पाच मोबाईल व नऊ हजार रूपये रोख जप्त केले. त्यांच्यावर भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीत पाच जणांचा समावेश असून ते सर्व उत्तरप्रदेशच्या बांदा येथील रहिवासी आहेत. यात रिंकू सुरेश चौरसिया (२५), इकबाल उर्फ अक्कू जहरूद्दीन (२४), सनी श्रीवास्तव (२८), शकील कुर्बान खान (३७) व वसीम नशीर जमाल (२१) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांतून अटक करण्यात आले आहे.वर्षभरात रेल्वे संपत्ती चोरीची ६ प्रकरणे१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ मध्ये रेल्वे संपत्ती अवैध कब्जा अधिनियमांतर्गत सहा प्रकरणांची नोंद आहे. यात १३ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २३ हजार ४७५ रूपयांच्या साहित्याची रिकव्हरी करण्यात आली आहे. तर रेल्वे अधिनियमाच्या विविध कलमान्वये ४ हजार १४८ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून १४ लाख ३८ हजार ४२० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.२९ प्रकरणांत ४० आरोपींना अटकगोंदियाच्या रेल्वे सुरक्षा दलाने प्रवासादरम्यान चोरीच्या घटना उघड करून चोरांना अटक करण्यासाठी गठित केलेल्या टास्क टीमने २०१७ मध्ये वर्षभरात २९ प्रकरणांत ४० आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून प्रवाशांच्या सामान चोरीतील तीन लाख १७ हजार ४२९ रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दारू वाहून नेण्याच्या सात प्रकरणांत १० आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४९ हजार रूपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.