शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिकदृष्टया कमजोर विद्यार्थ्यांसाठी शिक्षा निधीचे गठन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:52 IST

राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेच्या २३ जून रोजी पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत समाजातील गुणवंत मात्र आर्थिकदृष्टया कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध व्हावे. या उद्देशाने पहिल्यांदाच शिक्षा निधी निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजाचे कार्य तळागळापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हास्तरावर संघटन तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देपवार क्षत्रिय महासभेचा निर्णय : विविध विषयांवर झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेच्या २३ जून रोजी पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत समाजातील गुणवंत मात्र आर्थिकदृष्टया कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध व्हावे. या उद्देशाने पहिल्यांदाच शिक्षा निधी निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजाचे कार्य तळागळापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हास्तरावर संघटन तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुरलीधर टेंभरे होते. या वेळी संरक्षक माजी अध्यक्ष टी.डी.बिसेन, डॉ.एन.डी.राऊत, महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेश देशमुख, राजेंद्रप्रसाद पटले, मोतीलाल चौधरी, अ‍ॅड. किरणलता चोपडे, अशोक बिसेन राष्ट्रीय संघटन सचिव खेमेंद्र कटरे, कोषाध्यक्ष रमेश टेंभरे, सहकोषाध्यक्ष दिलीप रहागंडाले, जनसंवाद सचिव सुनील गौतम, सुखदेव पारधी, युवा अध्यक्ष प्रल्हाद पटले, सहसचिव सुरेश देशमुख, मनोज भैरम, जितेंद्र बिसेन यांच्यासह सदस्य अर्पण बिसेन (इंदोर),जगदीशचंद्र पवार (बैतुल), अ‍ॅड. रु पेंद्र कटरे, जगदीश येडे, नेपालसिंह तुरकर, विद्या बिसेन, देवेंद्र चौधरी, मनमोहन रहागंडाले, लिखेंद्र बिसेन यांच्यासह भंडारा, नागपूर, हिगंणा, भिलाई, रायपूर, बालाघाट, तुमसर, रामटेक, छिंदवाडा येथील पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीची सुरवात चक्र वर्ती राजाभोज व गडकालिका माता यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. बैठकीत महासभेच्या ११३ वर्षाच्या सामाजिक कार्याची माहिती देण्यात आली.यावर्षीची पहिली आमसभा (अधिवेशन) मध्यप्रदेशातील बैहर येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शैक्षणिक अभ्यासक्रमात सम्राट विक्रमादित्य व राजाभोज यांचे जीवनचरित्र समाविष्ट करणे आणि डाकतिकीट काढण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.पवार समाजातील अन्य शाखांसोबत समन्वय स्थापन करणे तसेच राजपूर पवार शाखेसोबत समन्वय स्थापन करण्यावर चर्चा करण्यात आली.पवार, पोवार समाज हा ओबीसी प्रवर्गात येत असल्याने या प्रवर्गातील सर्व योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी ओबीसी योजनांची माहिती देण्यात आली.