शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर, गोड आवाजाला भुलला; खंडणीच्या जाळ्यात अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 05:00 IST

वैवाहिक जीवनातील कलह, जोडीदाराकडून लैंगिक अपेक्षा अपूर्ण, कमी वयात झालेले लग्न, घटस्फोट, अधिकचा पैसा अशा गोष्टींमुळे समाजातील काही लोक ‘हनी ट्रॅप’ला बळी पडत आहेत. अशा लोकांच्या मोबाईलवर सोशल मीडियाद्वारे एखाद्या सुंदर महिलेची अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट येते व त्यानंतर औपचारिक ‘चॅटिंग’ सुरू होते. काही कालावधी जाताच व्हिडिओ कॉलिंग सुरू होते. अश्लील हावभाव आणि संवाद रेकॉर्ड केले जातात व त्यानंतर पैशांची मागणी होते.

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  सायबर गुन्हेगारांकडून सर्वसामान्य, मोठमोठ्या सेेलिब्रिटी, व्यापारी, उद्योजकांना गंडा घालण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जातात. सध्या ‘हनी ट्रॅप’चा नवा फंडा वापरून अनेकांना लाखाेंचा गंडा घालण्याचा सपाटाच सायबर गुन्हेगारांनी सुरू केला आहे. समाजातील आपल्या इज्जतीला घाबरून अशा घटनांमध्ये फसविले गेलेले बहुतांश जण पोलिसांत तक्रार करीत नाहीत. सोशल मीडियातील फेक अकाउंटवरून गुन्हेगार डाव साधत असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढत चालली आहे. वैवाहिक जीवनातील कलह, जोडीदाराकडून लैंगिक अपेक्षा अपूर्ण, कमी वयात झालेले लग्न, घटस्फोट, अधिकचा पैसा अशा गोष्टींमुळे समाजातील काही लोक ‘हनी ट्रॅप’ला बळी पडत आहेत. अशा लोकांच्या मोबाईलवर सोशल मीडियाद्वारे एखाद्या सुंदर महिलेची अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट येते व त्यानंतर औपचारिक ‘चॅटिंग’ सुरू होते. काही कालावधी जाताच व्हिडिओ कॉलिंग सुरू होते. अश्लील हावभाव आणि संवाद रेकॉर्ड केले जातात व त्यानंतर पैशांची मागणी होते. नकार दिला तर रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आणि चॅटिंग व्हायरल करून बदनामी करायची धमकी देत ब्लॅकमेलिंग केली जाते. अनेकजण गुन्हेगारांच्या दबावाला बळी पडतात आणि लाखो रुपयांना गंडविले जातात.

 राजकारणीही निशाण्यावरया प्रकारच्या जाळ्यात सेलिब्रिटी, राजकारणी, इतर क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींना ओढले जाते. फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियातील ॲप्सचा वापर यासाठी केला जात आहे. ‘हनी ट्रॅप’ करण्यासाठी फेक अकाउंटचा वापर केला जात आहे. समाजातील नामवंत व्यक्तींना लाखोंचा गंडा घातला जातो. परंतु, अनेकजण नाव खराब होऊ नये म्हणून अशा गुन्ह्यांची तक्रार पोलिसात करीत नाही.

अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारलेली बरी- सुरुवातीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून साधारण बोलचाल केली जाते. हळूहळू रंगात येऊन पुरुषांना उत्तेजना मिळेल अशा गप्पा मारल्या जातात. त्यानंतर अश्लील फोटो, व्हिडिओ पाठवून व्हिडिओवर अश्लील चाळे केले जातात. - धनाढ्य पुरुषांना लुटने हाच एकमेव प्रयास यातून होत असतो. ‘हनी ट्रॅप’ करण्यासाठी या प्रकारात महिलांचा वापर करून फसविले जाते. धनाढ्य लोकांना या जाळ्यात ओढले जाते. - एकदा जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीला गंडविल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. पैसा न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली जाते.

कुठलीही वैयक्तिक माहिती देऊ नका. खासगी विषयावर कुठलाही संवाद करू नका. अनोळखी क्रमांकावरून आलेला व्हिडीओ कॉल स्वीकारू नका. कोणत्याही अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. स्वीकारल्यास त्यांना व्हॉट्सॲप क्रमांक देऊ नये, असे केल्यास तुमचा व्हिडीओ कॉल आणि स्क्रीनशॉट काढून तुम्हाला बदनाम करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी होईल. त्यामुळे अशा फसव्या कॉलपासून अधिक सतर्क राहा.- तेजस्विनी कदम, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, गोंदिया 

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम