लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी: नवीन सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत मुंबई येथे असतांना येथील शेतकऱ्यांचे शेतातील पुंजणे जळाल्याची माहिती मला मिळाली. तेव्हा लगेच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्याना सांगीतले की, तुम्ही पिडीत शेतकºयांना भेटून त्यांना धीर द्या. आमदार हा सर्व शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांचा आणि सव जाती धर्मातील लोकांचा आहे. तुमच्या संकटात तुमच्या पाठीशी उभा आहे.पक्षभेद बाजूला ठेऊन आधी शेतकºयांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहणे हेच आपले पहिले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन आ.सहषराम कोरोटे यांनी केले.रविवारी (दि.२२) रोजी चिचगड येथे परिसरातील एकूण ५६ पुंजणे जळालेल्या नुकसानग्रस्त शेतकºयांना जिल्हा परिषद गोंदिया आणि तालुका काँग्रेस कमेटी देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्थिक सहाय्यता वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक सहाय्यता वाटप आ.कोरोटे यांच्या हस्ते व जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी जि.प.चे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे, समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम बाबा कटरे, जि.प.सदस्य उषा शहारे, जि.प.सदस्य माधुरी कुंभरे, माजी जि.प.अध्यक्ष प्रल्हाद भोयर, तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राधेश्याम बगडीया, माजी जि.प.सदस्य घासीलाल कटकवार, काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ता अॅड. प्रशांत संगीडवार, डॉ.अनिल चौरागडे, परमजितसिंग भाटीया, अतिरीक्त तहसीलदार उईके, जि.प.व देवरी पं.स.येथील कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचाºयांसह चिचगड परिसरातील कडीकसा, पाऊलझोला, डोंगरगाव, सुंदरी, मोहाडी, ईस्तारी व भागी येथील शेतकरी, शेतमजूर उपस्थित होते.कोरोटे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणेला सांगीतले की तुम्ही तत्काळ घटनास्थळी पोहचून झालेल्या नुकसानीचे पंचनामे तयार करा. यानंतर एका शिष्टमंडळाला गोंदियाला पाठवून जिल्हा परिषदेकडून पिडीत शेतकºयांना त्वरीत आर्थिक मदत देण्याची मागणी केली. यावरुन जिल्हा परिषदमधील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी यात सहकार्य करीत प्रत्येक पिडीत शेतकºयांना २० हजार रुपयाची मदत मिळवून दिली.ही मदत नुकसानीच्या मोबदल्यात फार कमी होती म्हणून मी त्यांना फुल नाही फुलाची पाखळी म्हणून यात आणखी मदत करण्याकरीता पक्षातील इतर लोकांशी चर्चा केली. प्रत्येक पिडीतांना ५ हजार रुपयांनी रोख स्वरुपात रुपात मदत मिळवून देण्याकरीता प्रयत्न केले. या फलस्वरुप जि.प.कडून प्रत्येक पिडीत शेतकºयांना २० हजार रुपयाचे धनादेश व काँग्रेस पक्षाकडून ५ हजार रुपये रोख रुपात मदत अशा प्रकारे एकूण २५ हजार रुपयांची आर्थिक मदत एकूण ५६ पिडीत शेतकºयांना दिल्याचे सांगितले. चिचगड परिसरातील पुंजणे जाळल्याच्या प्रकरणात कोणाचा हात आहे ते मला माहित नाही. परंतु येथील पिडीत शेतकºयांच्या मुलांच्या तोंडाचा घास हिसकावून घेतलेचा प्रकार आहे. हा मुद्दा मी विधानसभेत सुध्दा लावून धरला. याबाबत विधानसभा अध्यक्षांसह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटून शेतकºयांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप भाटीया यांनी मांडले. संचालन सरपंच रंजित कासम यांनी केले तर आभार अण्णा जैन यांनी मानले. महासचिव बळीराम कोटवार,युवक काँग्रेसचे अध्यक्ष शकील कुरैशी, कुलदिप गुप्ता, शैकी भाटीया, प्रशांत कोटांगले, छगनलाल मुंगनकर, जैपाल प्रधान, नामदेव आचले यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यानी सहकार्य केले.
पक्षभेद विसरुन लोकांच्या संकटात पाठिशी उभे राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST
पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्याना सांगीतले की, तुम्ही पिडीत शेतकºयांना भेटून त्यांना धीर द्या. आमदार हा सर्व शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांचा आणि सव जाती धर्मातील लोकांचा आहे. तुमच्या संकटात तुमच्या पाठीशी उभा आहे.पक्षभेद बाजूला ठेऊन आधी शेतकºयांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहणे हेच आपले पहिले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन आ.सहषराम कोरोटे यांनी केले.
पक्षभेद विसरुन लोकांच्या संकटात पाठिशी उभे राहा
ठळक मुद्देसहषराम कोरोटे : ५६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वाटप