शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

समाधान सेलमुळे समस्यांचे वेळीच निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:54 IST

सततच्या कर्तव्यामुळे तणावाखाली वावरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आणि समस्यांचे वेळीच निराकारण व्हावे. त्यांना कुठल्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, यासाठी पोलीस मुख्यालयात समाधान सेल तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपोलीस विभागाचा उपक्रम : कर्मचाऱ्यांची पायपीट थांबविण्यास मदत, तक्रारी झाल्या कमी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सततच्या कर्तव्यामुळे तणावाखाली वावरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आणि समस्यांचे वेळीच निराकारण व्हावे. त्यांना कुठल्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, यासाठी पोलीस मुख्यालयात समाधान सेल तयार करण्यात आले आहे. यावर कर्मचाऱ्यांनी आॅनलाईन तक्रार केल्यास त्याची वेळीच दखल घेवून त्यांचे निराकरण केले जाते. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत आहे.पोलीस कर्मचाऱ्यांचे जीवन सतत धावपळीचे असते. बरेचदा कर्तव्य बजावताना कुटुंबापासून दूर रहावे लागते. तर कधी विभागातंर्गत येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होती. त्याचा बरेचदा कर्तव्य बजाविताना परिणाम होतो. तर छोट्या छोट्या तक्रारी करण्यासाठी नेहमीच वरिष्ठांकडे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये बरेचदा असंतोष निर्माण होतो. यासर्व गोष्टी टाळता याव्या, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आणि समस्यांची वेळीच दखल घेवून त्याचा निपटारा करता यावा. यादृष्टीने जिल्हा पोलीस विभागाने समाधान सेल ही आॅनलाईन प्रणाली कार्यान्वीत केली आहे. या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांना त्यांची समस्या मांडण्यासाठी इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही. विभागातच त्यांच्या समस्यांचे समाधान केले जात आहे. यामुळे वरिष्ठ अधिकारी भेटत नसल्याची व तक्रार ऐकूण घेत नसल्याची ओरड देखील कमी झाली आहे. त्यामुळे विसंवाद दूर होवून संवादाच्या माध्यमातून समस्यांचे निवारण होत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण ठेवण्यास मदत होत आहे. पोलीस विभागाने समाधान सेल सुरू केल्यापासून बऱ्याच समस्यांचे वेळीच निराकरण होत असल्याने पोलीस कर्मचारी समाधानी असल्याचे चित्र आहे.दिशाभूल टाळण्यास झाली मदतकाही असंतुष्ट कर्मचारी वरिष्ठ अधिकारी तक्रारींची दखल घेत नाही, समस्यांचे वेळीच निराकारण होत नसल्याचे सांगून इतर कर्मचाऱ्यांची दिशाभूल करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण केले जात होते. तर प्रत्यक्षात वस्तू स्थिती न जाणून घेता विभागावर आरोप केले जातात. मात्र या सर्व गोष्टींवर समाधान सेलमुळे वेळीच मात करणे शक्य झाले.असंतुष्ट कर्मचाºयांकडूृन इतर कर्मचाऱ्यांची होणारी दिशाभूल सुध्दा टळली.डीजी लोनसाठी सर्वतोपरी मदतपोलीस कर्मचाऱ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांना डीजी लोन योजनेतंर्गत कर्ज उपलब्ध करुन दिले. यासाठी अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे जोडून प्रकरणे सादर केल्यानंतर त्यांची चाचपणी करुन प्रकरणे मंजूर केली जातात. पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भूजबळ यांनी स्वत: पुढाकार घेवून ३४ कर्मचाऱ्यांची कर्जाची प्रकरणे मंजूर करुन देवून त्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारण्यास मदत केली.प्रशिक्षणातून मार्गदर्शनसमाधान सेलकडे आॅनलाईन तक्रारी कशा करायच्या, तसेच समस्या कशा मांडायच्या यासाठी जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना कार्यशाळा घेवून त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणातून कर्मचाऱ्यांना इतर गोष्टींचे मार्गदर्शन केले जात असल्याने त्यांचे समाधान होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Policeपोलिस