शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

जिल्ह्यातील समस्या त्वरित सोडवा

By admin | Updated: March 16, 2015 00:09 IST

जिल्ह्यातील प्रलंबित समस्यांची त्वरित सोडवणूक करावी, अशी मागणी करीत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या सोबत चर्चा केली.

गोंदिया : जिल्ह्यातील प्रलंबित समस्यांची त्वरित सोडवणूक करावी, अशी मागणी करीत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या सोबत चर्चा केली. या चर्चेत, आमदार अग्रवाल यांनी तालुक्यातील चिरामणटोला या गावाला परसवाडा, कटंगटोला व झिलमीली या गावांपासून वेगळे करून स्वतंत्र गावाची स्थापना करण्याबाबत विशेष प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. तर सन २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांचा सुमारे ७० लाख रूपयांचा निधी लवकरात लवकर तहसीलदारांना उपलब्ध करवून वितरित करण्याचीही मागणी केली. या सोबतच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करावे, तालुक्यातील झुडपी जंगलांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, शहरातील प्रलंबीत नझूल पट्यांचे नवीनीकरण, नगरपरिषदद्वारा बीआरजीएफ व वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत प्रस्तावीत पथदिव्यांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी देणे, शहरातील नवीन उड्डाण पूल निर्माणाकरिता अधिग्रहीत करण्यात आलेली नगरपरिषद बाग व प्रताप क्लबच्या जागेच्या भरपाईच्या प्रस्तावाला मंजुरी देणे, सिव्हील लाईन्स हनुमान चौकात समाज भवनाची जागा नगरपरिषदेला उपलब्ध करावी, जीएनएम व एएनएम नर्सिंग कॉलेजची जागा निश्चित करावी, जिल्हा क्रिडा संकूलच्या जागेचा वाद सोडवावा तसेच अतिरिक्त आंतरिक सुधार मंजूर करणे, शहरातील प्रलंबित घरकुलांची यादी मंजूर करने यासहीत अन्य मुख्य विषयांवर चर्चा करण्यात आली. यावर आयुक्त अनुपकु मार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित बोलावून योग्य कारवाईचे निर्देश दिले. (शहर प्रतिनिधी)