लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील चिचगड परिसरातील ५० हून अधिक शेतकऱ्यांचे धानाचे पूंजणे जळाले. याप्रकरणी आमदार सहषराम कोरोटे यांच्या सूचनेवरून तालुका काँग्रेस कमिटीने बैठक घेऊन पीडित शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपयांची मदत करण्याच निर्णय घेतला आहे.शेतकऱ्यांचे धानाचे पुंजने जळाल्याची माहिती मिळताच आदार कोरोटे यांनी तालुका काँग्रेस पक्षाच्या एका शिष्टमंडळाला घटनास्थळी पाठवून झालेल्या नुकसानीचा अहवाल मागविला. तसेच काँग्रेस पक्षाकडून पिडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरिता काही प्रयत्न करावे असे सूचना दिल्या. यावरुन शनिवारी (दि.३०) येथील कोरोटे भवनात तालुका काँग्रेसची तातडीची सभा तालुकाध्यक्ष संदीप भाटीया यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली.या सभेत पिडित शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येक पिडित शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत आणि जिल्हा परिषद व शासनाकडून पिडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता पाठपुरावा करण्यासंबंधात चर्चा करण्यात आली. या सभेत माजी तालुकाध्यक्ष राधेशाम बगडीया, वरिष्ठ कार्यकर्ता अॅड. प्रशांत संगिडवार, डॉ. अनिल चौरागडे, राकाँचे वरिष्ठ कार्यकर्ता भैयालाल चांदेवार, तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, युवक काँग्रेसचे कुलदिप गुप्ता, राजा कोरोटे, प्रशांत कोटांगले, सारदूल संगीडवार, कमलेश पालीवाल, नेपाल प्रधान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेच्या माध्यमातून समाजातील इतर सामाजिक कार्यकर्ता, संस्था व राजकीय पक्षाकडून जास्तीत जास्त प्रमाणात आर्थिक मदत करण्याचे आवाहन ही करण्यात आले.
पीडित शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपयांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST
शेतकऱ्यांचे धानाचे पुंजने जळाल्याची माहिती मिळताच आदार कोरोटे यांनी तालुका काँग्रेस पक्षाच्या एका शिष्टमंडळाला घटनास्थळी पाठवून झालेल्या नुकसानीचा अहवाल मागविला. तसेच काँग्रेस पक्षाकडून पिडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरिता काही प्रयत्न करावे असे सूचना दिल्या.
पीडित शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपयांची मदत
ठळक मुद्देतालुका कॉँग्रेस कमिटीचा निर्णय : तालुका पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी