शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त पाच हजार शेतकरी मदतीला मुकले

By admin | Updated: March 13, 2017 00:21 IST

सन २०१५ च्या खरीप हंगामात गोंदिया जिल्ह्यातील १०९ गावे महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त घोषीत केली.

८४ गावांतील शेतकऱ्यांचे हाल : कापणी प्रयोग उंबरठ्याने केला घात नरेश रहिले   गोंदिया सन २०१५ च्या खरीप हंगामात गोंदिया जिल्ह्यातील १०९ गावे महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त घोषीत केली. परंतु या १०९ पैकी आमगाव विधानसभा क्षेत्रातील ८४ गावातील ५ हजार ३५७ शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. मागील एक वर्षापूर्वी आ. संजय पुराम यांनी शासन दरबारी शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी केली. परंतु आतापर्यंत या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. उंबरठा उत्पन्नापेक्षा चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न जास्त असल्याचे दाखविल्याने या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचीत ठेवण्यात आले आहे. मागील दिड वर्षापासून या दृष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत न दिल्याने आ. संजय पुराम यांनी ६ मार्च २०१६ रोजी महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे निवेदन देऊन त्या ८४ गावातील शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली. परंतु एक वर्ष लोटूनही त्यांच्या सरकारने त्यांच्या मागणीला मान्य केले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया यांच्याकडून अहवाल मागविला. त्या अहवालानुसार जिल्ह्यात खरीप हंगाम २०१५ अंतर्गत जिल्ह्यातील ४ तालुक्यातील १०९ गावे २३ मार्च २०१६ ला दुष्काळसदृश गावे म्हणून जाहीर करण्यात आली. आमगाव विधानसभा क्षेत्रात सन २०१५-१६ मध्ये तालुका देवरी, आमगाव व सालेकसा येथील राष्ट्रीय कृषी पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये ५६३० शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता. यापैकी फक्त सालेकसा तालुक्यातील २७३ शेतकऱ्यांनाच राष्ट्रीय कृषी विमा कंपनी कडून ११६४०९.१५ रूपये नुकसान भरपाई देण्यात आली. सालेकसा तालुक्यात कावराबांध, सालेकसा व साखरीटोला या तीन राजस्व मंडळापैकी फक्त कावराबांध या राजस्व मडळातील पिक कापणी प्रयोगाचे उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आल्यामुळे केवळ त्याच राजस्व मंडळातील पिक विमा हप्ता भरलेलल्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उंबरठा उत्पन्नापेक्षा सरासरी उत्पन्न अधिक राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना ही पिक कापणी प्रयोगावर आधारीत आहे. कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झालेल्या नियोजनानुसार महसूल, कृषी, जि.प. मधील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना पिक कापणी प्रयोगाचे नियोजन देण्यात येते. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून पिक कापणी प्रयोगाचे तक्ता क्रं.२ प्राप्त झाल्यानंतर राजस्व मंडळ, तालुकानिहाय आलेले भात पिकाचे उत्पादकतेचे संकलन करून कृषी आयुक्तालयास सादर करण्यात येते. कृषी आयुक्तालय हे त्या वर्षात आलेली सरासरी प्रति हेक्टरी उत्पादकता विमा कंपनीस सादर करते. शासन निर्णयानुसार भात पिकाचे जोखीमस्तर (उंबरठा उत्पन्न) ६० टक्के आहे. अधिसूचित राजस्व मंडळामधील मागील ५ वर्षाचे प्रती हेक्टरी सरासरी उत्पन्न ६० टक्के म्हणजेच ते त्या राजस्व मंडळाचे उंबरठा उत्पन्न होय. उंबरठा उत्पन्नापेक्षा चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न कमी आले तरच नुकसान भरपाई देण्यात येते. उंबरठा उत्पन्नापेक्षा चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न जास्त आल्याने आमगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई दिली नाही. ११३७९ शेतकऱ्यांनी काढला होता पिक विमा ४गोंदिया जिल्ह्यात सन २०१५ च्या खरीप हंगामात राष्ट्रीय कृषी विमा कंपनी कडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार खरीप हंगामामध्ये भात पिकाचा विमा ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी काढला होता. या शेतकऱ्यांनी १६६३८.०२ हेक्टर शेतीचा विमा केला होता. ८ तालुक्यापैकी गोंदिया, गोरेगाव व सालेकसा या तीन तालुक्यातील १०८४ शेतकऱ्यांना १६२६२२८.४१ रूपये नुकसान भरपाई राष्ट्रीय कृषी विमा कंपनी कडून देण्यात आले.