शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पाच उपोषणकर्ते रुग्णालयात दाखल

By admin | Updated: April 8, 2016 01:34 IST

स्थानिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसलेल्या पाच इसमांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अर्जुनी मोरगाव : स्थानिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसलेल्या पाच इसमांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्यापही पाच उपोषणकर्त्यांचे उपोषण सुरूच आहे. येत्या १ ते २ दिवसात यावर तोडगा निघाला नाही तर उर्वरित उपोषणकर्त्यांना रुग्णालयात हलविण्याची शक्यता नाकारता येत नाही. महालगाव येथील समाजमंदिराला लागून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धाच्या मूर्त्या मांडण्यात आल्या. या मूर्त्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी महालगाव येथील १० लोकांनी ३० मार्चपासून स्थानिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आरंभले. आज उपोषणाचा नववा दिवस आहे. प्रशासनातर्फे अद्यापही या मागणीवर कोणताच तोडगा निघू शकला नाही.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. मात्र उपोषणकर्ते रुग्णालयात दाखल होण्यासाठी तयार नाहीत. बुधवारी रात्री सुमारे ९ वाजताचे सुमारास पोलिसांनी उपोषणकर्त्यांची रुग्णालयात दाखल होण्यासाठी विनवणी केली. नकार दर्शविल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच उपोषणकर्ते दाखल झाले. मात्र उपोषणकर्ते उपोषणस्थळी परत आले. रुग्णालयात दाखल झालेल्यात दिनेश उदाराम मारगाये, बाबुराव धर्मा भोयर, रामदास रघुनाथ नाईक, रावजी अर्जुन मारगाये व यशवंत चेपटू चुलपार यांचा समावेश आहे. पुंडलिक मारगाये, योगेश मारगाये, मुकेश नाईक, चिंतामण राणे व उद्धव भोयर हे अद्यापही आमरण उपोषणावर आहेत. (तालुका प्रतिनिधी)