शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

पाच जणांनी केले पोलिसांकडे हत्यारे जमा

By admin | Updated: September 9, 2016 01:09 IST

भामरागड तालुक्यातील संवेदनशील भाग असलेल्या नारगुंडा गावात पोलिसांच्या आवाहनानंतर नागरिकांनी एक गाव, एक गणपती

नारगुंडात एक गाव, एक गणपती : नक्षल्यांना मदत न करण्याचा केला संकल्पगडचिरोली : भामरागड तालुक्यातील संवेदनशील भाग असलेल्या नारगुंडा गावात पोलिसांच्या आवाहनानंतर नागरिकांनी एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबवून पोलिसांकडे आपले पाच भरमार हत्यारही सुपूर्द केले व नक्षल्यांना मदत न करण्याचा व हत्यार न उचलण्याचा संकल्प गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांनी जाहीर केला. भामरागडसारख्या संवेदनशील भागात झालेली ही घटना निश्चितच मोठी नांदी म्हणावी लागेल.गडचिरोलीपासून १८० किमी अंतरावर नारगुंडा गावात पूर्वी गावकरी व पोलीस वेगवेगळे गणपती बसवायचे. परंतु यावेळी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी संदीप मिश्रा, सीआरपीएफ ३७ बटालियनचे सहायक कमांडंट अनुपम सिंह यांनी पुढाकार घेऊन गावकरी व पोलिसांची बैठक घेतली व एक गाव, एक गणपती मांडण्याचा निर्णय घेतला. सर्व सहमतीने यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी प्रभारी अधिकारी संदीप मिश्रा व सीआरपीएफचे सहायक कमांडंट अनुपम सिंह यांनी नागरिकांना नक्षलवाद्यांना मदत करू नका, आपल्याकडे हत्यार असेल तर ते जमा करून समाजाच्या मूळ प्रवाहात सामील व्हा, असे आवाहन केले. लागलीच या आवाहनाला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी नक्षलमुक्त गाव करण्याचा संकल्प करीत यापुढे शस्त्र न उचलण्याचा निश्चय जाहीर केला. या कार्यक्रमाला केंद्रीय राखीव पोलीस दलाचे निरीक्षक रामासिंहासन, पोलीस उपनिरीक्षक वाघ, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार चुक्कू विडपी आदी उपस्थित होते. यावेळी गावकरी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)