शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ेगुंडगर्दी करणाऱ्या पाच जणांना अटक

By admin | Updated: September 11, 2016 00:24 IST

पिस्टल, तलवार व लोखंडी राड घेऊन गावकऱ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गोंदियातील पाच जणांना रावणवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

नागरिकांवर प्राणघातक हल्ला: पिस्टल, तलवार व राड जप्तगोंदिया : पिस्टल, तलवार व लोखंडी राड घेऊन गावकऱ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गोंदियातील पाच जणांना रावणवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारच्या रात्री ११ वाजता दरम्यान मरारटोला (तेढवा) येथे करण्यात आली. गोंदिया तालुक्याच्या मरारटोला तेढवा येथे सार्वजनिक गणेशोत्सवात कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेनंतर १० वाजताच्या सुमारास एक खाली ट्रॅक्टर भरधाव वेगात गावातून धावत होता. यावेळी रस्त्यावर बालके असल्याने अपघात होऊ नये यासाठी नागरिकांनी त्या ट्रॅक्टरच्या दिशेने धाव घेतली. मात्र ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला. त्यानंतर त्याने फोन करून आपल्या साथीदारांना बोलावल्यामुळे गोंदियातील पाच जण एक पीस्टल, दोन तलवार व लोखंडी राड घेऊन रात्री १०.३० वाजता दाखल झाले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांवर हल्ला चढविला. एकत्र गावकरी आल्याने आरोपींनी पिस्टलचा धाक दाखवित ठार करण्याची धमकी दिली. आरोपी गणीखान जब्बार खान (२९) रा. न्यू लक्ष्मीनगर गोंदिया, इमरान महफूज खान (२८) रा. टी.बी.टोली गोंदिया, बंदे शब्बीर खान (२४) रा. रेलटोली गोंदिया,राहूल सुनिल नेवारे (२४) रा. न्यू लक्ष्मीनगर गोंदिया व दुर्गेश लक्ष्मण विठोले (१९) रा. अंगुरबगीचा गोंदिया यांनी गावात दहशत पसरविल्याने रात्रभर गावात दहशतीचे वातावरण होते. या प्रकरणातील स्कार्पीओ क्र.एमएच ३५ पी ४८०३, ट्रॅक्टर एमएच ३५ एफ ४८२९ ट्राली क्र.एमएच ३५ जी ८१३८ व मोटारसायकल एमएच ३५ एल ७८२३ हे तीन वाहन, एक पीस्टल, दोन तलवार व लोखंडी राड जप्त करण्यात आल्या. सदर आरोपींविरूध्द भादंविच्या कलम ३०७, १४७, १४९, सहकलम ३, ४, २५ भारतीय हत्यार कायदा, सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींना १२ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ट्रॅक्टर चालविणारा तो कोण याची माहिती घेणे सुरू आहे. तपास ठाणेदार संजीव गावडे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)