शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

पाचवीच्या भूगोलाचे पाच धडे गायब

By admin | Updated: August 1, 2015 02:10 IST

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणेच्या वतीने निर्मित पाचव्या वर्गाच्या भूगोल विषयाच्या काही ..

सदोष पुस्तकांचे वापट : शिक्षण विभाग अनभिज्ञगोरेगाव : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणेच्या वतीने निर्मित पाचव्या वर्गाच्या भूगोल विषयाच्या काही पुस्तकातील पाच धडेच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. स्थानिक शहीद जान्या-तिम्या जि.प.शाळेत असे सदोष पुस्तक विद्यार्थ्याना वाटप झाल्याचे आढळले. या प्रकारामुळे शिक्षण विभागाकडून प्रकाशित पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विशेष म्हणजे ही बाब त्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतू शिक्षकाने ही बाब गांभिर्याने घेतली नाही. त्यामुळे या प्रकाराबाबत शाळेकडून कोणतीही तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आलेली नाही. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ आणि महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० नुसार राज्याचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमांतर्गत २०१३-१४ या शालेय वर्षापासून भूगोल विषयाचे हे पाठ्यपुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यातील काही पुस्तकातील मधातले पाच धडेच गायब असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे सदर पुस्तक साऱ्या महाराष्ट्रात वाटल्या गेल्याने विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन कसे करावे असा प्रश्न विद्यार्थी-पालकांना पडला आहे. या पुस्तकातून गायब झालेले पाच धडे कसे काय गायब झाले हा संशोधनाचा विषय आहे. हा मुद्रणकीत दोष असला तरी तो कसा झाला? याची चौकशी होणार का? असे प्रश्न काही पालकांनी उपस्थित केले. पाच धडे गायब असल्याचा प्रकार जाम्या-तिम्या शाळेतील प्रतिक राज बोम्बार्डे या पाचव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. यावर विद्यार्थ्यांने सदर बाब वर्ग शिक्षकांच्या लक्षात आणून दिली. पण वर्ग शिक्षकाने काही नाही होत असे बोलून त्याकडे दुर्लक्ष केले आणि ही बाब दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिक बोम्बार्डे या विद्यार्थ्यांने सदर बाब आपल्या पालकाला सांगितली. यावर पालक राज बोम्बार्डे यांनी जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे याबाबत तोंडी तक्रार केली.गोंदिया जिल्ह्यात भूगोल विषयाच्या पाचव्या वर्गासाठी लाखो पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत. यातील किती पुस्तके दोषपूर्ण आहेत याविषयी शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे. ग्रामीण भागात अशाच पद्धतीने सदोष पुस्तकांचे वाटप झाले असण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)