शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

हजार मुलांमागे वाढल्या पाच मुली !

By admin | Updated: April 24, 2016 01:59 IST

मुलगा वंशाचा दिवा समजणाऱ्या लोेकांना कायद्याचा वचक बसला कि जनजागृतीमुळे झालेला परिवर्तन आहे हे सांगणे निश्चीत नसले तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत...

फुलू लागले मुलींचे जीवन : देवरी व सालेकसा तालुक्यात मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिकनरेश रहिले गोंदियामुलगा वंशाचा दिवा समजणाऱ्या लोेकांना कायद्याचा वचक बसला कि जनजागृतीमुळे झालेला परिवर्तन आहे हे सांगणे निश्चीत नसले तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत ंयावर्षी मुलींच्या जन्मात वाढ झाली आहे. सन २०१४-१५ या वर्षात एक हजार पुरूषामागे ९५२ मुली जन्माला आल्या होत्या. परंतु यावर्षी सन २०१५-१६ या वर्षात एक हजार पुरूषामागे ९५७ मुली जन्माला आल्याची जिल्ह्याची आकडेवारी दर्शविते. या चांगल्या बातमीने सामाजिक समतोल राखण्यास मोलाची मदत होणार आहे.सन २००१ या वर्षी जिल्ह्याचे पुरूषाच्या तुलनेत मुलीचे जन्मदर १००५ होता. त्यानंतर २००९-१० मध्ये ९२९ झाला. सन २०१०-११ मध्ये ९५४, २०११-१२ पुन्हा ९२९ झाला. परंतु सन २०१२-१३ या वर्षात सदर ९७२ वर गेला. परंतु त्यानंतर सतत मुलींचे जन्मदर घटत राहीले. सन २०१३-१४ मध्ये ९४४, २०१४-१५ मध्ये ९५२ होता. परंतु या वर्षी मुलींच्या आकड्यात वाढ झाली आहे. दर हजारी पुरूषांमागे ९५७ मुली जन्माला आल्या आहेत.गोंदिया जिल्ह्यात देवरी व सालेकसा तालुक्यात मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे. देवरी तालुक्यात १०३४ तर सालेकसा तालुक्यात १०८९ मुलींनी जन्म घेतला आहे. परंतु सडक-अर्जुनी, आमगाव, गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव व तिरोड़ा तालुक्यात भयावह स्थिती आहे.डीएचआयएस-२ च्या दिलेल्या आकडेवारीनुसार सन २०१५-१६ जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर हजारी पुरूषांमागे ९५७ आहे. यावर्षी जिल्ह्यात १८ हजार ९३६ बालके जन्माला आले.यात आमगाव १०८१, अर्जुनी-मोरगाव १३४०, देवरी १५६८, गोंदिया १०७६२, सडक-अर्जुनी १०१७, सालेकसा ८७३, तिरोडा १३१९, गोरेगाव ९७६ बालक जन्माला आले.कन्याजन्मानंदात सालेकसा, देवरी जिल्ह्यात सालेकसा व देवरी ह्या दोन तालुक्यात मुलींच्या जन्मदराची स्थिति चांगली आहे देवरी तालुक्यात दर हजारी पुरूषांमागे १०३४ तर सालेकसा तालुक्यात हजारी पुरूषांमागे १०८९ मुलींनी जन्म घेतला आहे. गोंदिया तालुका जिल्ह्याच्या आकडेवारीपेक्षा अधिक म्हणजेच ९७१ संख्या आहे. सडक-अर्जुनीत स्त्री भू्रणहत्या?जिल्ह्यात देवरी, सालेकसा व गोंदिया तालुक्याला वगळता पाच तालुक्यात मुलींचा जन्मदर कमी आहे. परंतु सार्वात वाईट परिस्थिती सडक-अर्जुनी तालुक्याची आहे. हजारी पुरूषामागे १६४ मुलीं कमी जन्माला आल्या आहेत. फक्त ८३६ मुली हजारी पुरूषामागे जन्माला आल्या आहेत. आमगाव ८८३, गोरेगाव ८९५, अर्जुनी-मोरगाव ८९८ व तिरोडा तालुक्यात ९४८ मुलींनी जन्म घेतला आहे. ३६३ उपजत मृत्यूजिल्ह्यात सन २०१५-१६ या वर्षात १८ हजार ९३६ बालकांनी जन्म घेतला. यातील १.९१ टक्के म्हणजेच ३६३ बालकांचा मृत्यू झाला आहे. गोंदिया आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल असल्याने जिल्ह्यातील महिलांमध्ये आरोग्या संबधी पाहिजे तेवढी जनजागृती झाली नाही. महिलांच्या असंतुलीत आराहारमुळे बाळ पोटातचत कुपोषित होते. परिणामी जन्म घेतल्यानंतर दगावत असतात. आमगाव तालुक्यात १४, अर्जुनी-मोरगाव १६, गोंदिया २२८, सडक-अर्जुनी ११, सालेकसा १८, तिरोडा २६ व गोरेगाव २४ बालकांचा मृत्यू झाला आहे.