शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पहिल्याच पावसात पुल गेला वाहून

By admin | Updated: July 8, 2016 01:49 IST

तालुक्यातील अतीदुर्गम ककोडी क्षेत्रातील बुजरबडगा-हेरपार मार्गावर मग्रारोहयोअंतर्गत बनविल्या गेलेला २२ लाखांचा पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने ...

कारवाईची मागणी : बुजरबडगा-हेरपार मार्गावरील घटना देवरी : तालुक्यातील अतीदुर्गम ककोडी क्षेत्रातील बुजरबडगा-हेरपार मार्गावर मग्रारोहयोअंतर्गत बनविल्या गेलेला २२ लाखांचा पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने मग्रारोहयो विभागात एकच खळबळ उडाली आहे. इस्तारी ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगा विभागातील अधिकाऱ्यांच्या संगणमताने नियमबाह्य पद्धतीने २२ लाख रुपयांच्या या पुलाचे निर्माण करण्यात आले. बुजरबडगा या गावाजवळ या पुलाचे बांधकाम २ महिन्यापूर्वी करण्यात आले. कंत्राटदार अशोक राऊत द्वारा नकृष्ट साहित्याचा वापर व एस्टीमेटनुसार कार्य न झाल्याने पूल वाहून गेला. गुरूवारी (दि.७) घटनास्थळाची पाहणी केली असता २८ मिटर लांबीच्या या पुलाच्या दोन्ही बाजूला २ ते ३ मिटर पूल पूर्णपणे वाहून गेला असून पुलावर भेगा पडलेल्या दिसून आल्या. विशेष म्हणजे, कंत्राटदाराची माणसे आज पुलाला ढिगळ लावण्याचे काम करीत होते. एस्टीमेटनुसार सिमेंट व गिट्टीचा वापर न झाल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी लावला. पुलाच्या बांधकाम वेळेस नागरिकांनी आक्षेप घेवूनही कंत्राटदाराने स्वयंमर्जीने काम केले व म्हणूनच आज २२ लाख रुपयांचा पूल वाहून गेला आहे. हा पूल वाहून गेल्याने ऐन पावसाळ्यात बुजरबडगा, येडमागोंदी, कलकसाच्या लोकांना ककोडीला जाण्यास अडचण निर्माण होत आहे.२२ लाख रुपये किमतीच्या २८ मिटर लांबीच्या एवढ्या मोठ्या पुलाला मग्रारोहयोद्वारे कसे काय करण्यात आले असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मग्रारोहयोचे सहाय्यक अधिकारी गौतम साखरे यांना या पुलाबद्दल विचारले असता पुलाच्या बाजुची माती केवळ वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. तर याबाबत इस्तारी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जी.डी. चारथळ यांनी पूल वाहून गेल्याची कबुली दिली. आता या २२ लाखाच्या पुल भ्रष्टाचार प्रकरणी दोषी असलेल्या अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाई करुन पुलाचे बांधकाम करुन देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागत आहे. विशेष म्हणजे कंत्राटदार राऊत यांनी मग्रारोहयोत भ्रष्टाचार केल्याचे या अगोदर सुद्धा उघडकीस आले होते. परंतु मग्रारोहयोतील अधिकारी व पं.स.मधील पदाधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने कंत्राटदाराला दरवर्षी लाखोंची कामे दिली जात असल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)