शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

हृदयविकाराचा झटका आल्यास पहिला तास उपचारासाठी ‘सुवर्ण’ काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

गोंदिया तालुक्याच्या आसोली येथे जन्माला आलेले डॉ. प्रमेश अनिरूध्द गायधने यांनी एमबीबीएस जीएमसी यवतमाळ येथून, एम.डी मेडीसीन सोलापूर, डी.एम.हृदयविकार तज्ज्ञ म्हणून अहमदाबाद गुजरात म्हणून केले. त्याच ठिकाणी यू. एन. मेहता हे भारतातील हृदयारोगासाठी उत्तम हॉस्पीटल मानले जाते त्यात सेवा देऊन निघणारे डॉ. गायधने यांनी आपल्या जन्मभूमीतील रूग्णांना आपल्या योग्यतेचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी गोंदिया जिल्ह्यात सेवा देण्यासाठी पाय ठेवले.

ठळक मुद्देग्रामीण भागातही वाढतोय हृदयरोग, जीवनशैलीत बदल कारणीभूत

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कजीवनशैलीतील बदलामुळे शहराबरोबर आता ग्रामीण भागातही हृदयविकाराच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. परंतु ग्रामीण भागात राहणाऱ्या रूग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. रूग्णांना हृदयविकाराचा झटका आल्यापासून तासाभराच्या आत उपचार झाल्यास तो वेळ रूग्णांसाठी ‘सुवर्ण काळ असतो, असे गुजरातमधून सुवर्ण पदक मिळविणारे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. प्रमेश गायधने यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.गोंदिया तालुक्याच्या आसोली येथे जन्माला आलेले डॉ. प्रमेश अनिरूध्द गायधने यांनी एमबीबीएस जीएमसी यवतमाळ येथून, एम.डी मेडीसीन सोलापूर, डी.एम.हृदयविकार तज्ज्ञ म्हणून अहमदाबाद गुजरात म्हणून केले. त्याच ठिकाणी यू. एन. मेहता हे भारतातील हृदयारोगासाठी उत्तम हॉस्पीटल मानले जाते त्यात सेवा देऊन निघणारे डॉ. गायधने यांनी आपल्या जन्मभूमीतील रूग्णांना आपल्या योग्यतेचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी गोंदिया जिल्ह्यात सेवा देण्यासाठी पाय ठेवले. गोंदियात दाखल झाल्याबरोबर त्यांनी हृदयविकार रूग्णांना वेळेत उपचार मिळावा, परंतु तशी ग्रामीण भागात यंत्रणा उभी नसल्याने त्या रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी ‘महाकॅप’ नावाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून ४०० डॉक्टरांना त्यात समाविष्ट केले.या ग्रुपमध्ये हृदयविकाराचे २० विशेषतज्ज्ञ त्या ग्रुपमध्ये जुडले असून ते ग्रामीण भागातील रूग्णांना तत्काळ सेवा मिळावी म्हणून ग्रामीण डॉक्टरांना ते व्हॉट्सअ‍ॅपवर मार्गदर्शन करतात.गुजरातमध्ये त्यांना संधी असतांनाही त्यांनी त्या संधी सोडून आपल्या मातीतील लोकांना सेवा द्यावी म्हणून त्यांनी गोंदिया गाठले. हृदयरोगासंदर्भात जनजागृती व त्या रूग्णांना योग्य व वेळीच उपचार मिळावा यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. ग्रामीण भागातील डॉक्टर रूग्णांसंबधी सर्व माहिती त्या ग्रुपवर टाकतात त्यावर विशेष तज्ज्ञ मोफत वेळीच मार्गदर्शन करतात. अनेक रूग्णांना हृदयविकाराचा झटका आला हे समजत नाही. ज्यांना समजले ते इकडे-तिकडे उपचार करीत बसतात. परंतु योग्य उपचार त्यांच्यावर होत नसल्यामुळे रूग्णांचा मृत्यू होऊ शकतो. गोल्डन तासात रूग्णांवर उपचार झाल्यास त्या रूग्णांची पम्पींग कॅपेसिटी कमी होत नाही. त्यासाठी झटका आल्यापासून पहिला तास रूग्णांसाठी गोल्डन तास असतो. योग्य उपचारासाठी रूग्ण १२ तास, १६ तास किंवा २४ तास उशीर झाला तर त्यामुळे हृदयाला खूप जास्त इजा होते. हृदयाचे पडदे फाटू शकतात. भिंत फाटू शकते. त्यामुळे रूग्णाचा कधीही मृत्यू होऊ शकतो. सुरूवातीच्या दोन तासाच रूग्णाला कॅथलॅप सेंटरला पोहचविता असेल तर ते पोहचावे अन्यथा दोन तासात पोहचणे शक्य नसले तर झटका आल्याच्या अर्ध्या तासाच्या आत त्या रूग्णाला रक्त पातळ होण्याचे इंजेक्शन डॉक्टरकडून लावून घ्यावे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील ४०० गावातील ग्रामीण डॉक्टरांना वेळीच हृदयरोगासंदर्भात मार्गदर्शन करण्याचे काम डॉ. प्रमेश गायधने करीत आहेत. यासाठी त्यांचे हृदयविकार तज्ज्ञ असलेले २० मित्र या महाकॅप सोबत जुळले आहेत. गावातील डॉक्टर इसीजी काढून त्या ग्रुपवर पोस्ट केल्यानंतर क्षणाधार्थ त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रतिक्रीया दिली जाते. झटका आल्यास त्यावर मार्गदर्शन करण्यात येते.ग्रेस रजिस्ट्रीच्या सर्वेक्षणानुसार आता शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात हृदयरोग पाय पसरत आहे. गोंदिया जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात रूग्ण येतात. हायपरटेंशन, तंबाखू, बिडी व चरबी वाढत असल्यामुळे हृदयविकाराचे झटके येतात. लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील पीएचसी व सब सेंटरला मोफत ईसीजी देण्याचा पुढील माणस आहे. शाळांमध्ये जाऊन ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात तर शिक्षकांना हृदयरोगासंदर्भात जनजागृती डॉ. प्रमेश गायधने करणार असल्याचे गायधने यांनी सांगितले.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका