शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

पहिल्या दिवशी शिक्षक करणार काळीफीत लावून काम

By admin | Updated: June 23, 2014 23:56 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्याचे पगार झाले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेच्या विरोधात एल्गार पुकारत काळ्याफिती लावून पहिल्या दिवशी निषेध

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्याचे पगार झाले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेच्या विरोधात एल्गार पुकारत काळ्याफिती लावून पहिल्या दिवशी निषेध करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने दिला आहे.यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. यावर जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले. तर जूनच्या अखेर पर्यंत सर्व शिक्षकांचे वेतन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या पगारासंदर्भात शिक्षक समितीने वारंवार पाठपुरावा केला. मात्र जिल्हा परिषदेच्या उदासिनतेमुळे शिक्षकांचे पगार झाले नाही.यामुळे जिल्हा परिषदेच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने शाळेच्या पहिल्या दिवशी काळ्याफिती लावून काम करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, सरचिटणीस एल. यू. खोब्रागडे, शेषराव येडेकर, किशोर डोंगरवार, सुरेश रहांगडाले, पी.आर. पारधी, संदीप तिडके, बी.जी. राठोड, डी.एल. गुप्ता, संजय बोपचे, आर. के. ठाकरे, वाय. बी. चव्हाण, पी.टी. रंगारी, संदीप खेडीकर, नरेश बडवाईक, विलास डोंगरे, टी.डी. जमईवार, राजकुमार बसोने यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)