शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 21:31 IST

शासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क गणवेशाचे वाटप केले जाते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशातच यायला हवे असे असतांना शाळा सुरू होण्यास दहा दिवसाचा कालावधी शिल्लक असून ३ कोटी ५१ लाख रूपये गणवेशासाठी मिळाला नाही.

ठळक मुद्देसंडे अँकर । केवळ एक कोटी मिळाले, ३.५२ कोटी कधी मिळणार ?

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क गणवेशाचे वाटप केले जाते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशातच यायला हवे असे असतांना शाळा सुरू होण्यास दहा दिवसाचा कालावधी शिल्लक असून ३ कोटी ५१ लाख रूपये गणवेशासाठी मिळाला नाही. हा निधी न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेशात शाळेत जाता येणार नाही.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शासनातर्फे दोन जोडी गणवेश दिले जाते. त्या गणवेशासाठी ४०० रूपये दिले जायचे. गणवेशाच्या निधीत मागच्या वर्षीपासून २०० रूपयांनी वाढ करण्यात आली. गणवेशाची रक्कम डीबीटीमार्फत जमा करण्यात आल्यामुळे शून्य शिल्लकेवर खाते उघडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यातील गणवेशाची रक्कम बँकांनी कमीत कमी बॅलेंंन्स नसल्याचे कारण दर्शवून लाखो रूपये कपात केले. त्यामुळे डीबीटीच्या नादात हजारो विद्यार्थी गणवेशाविना राहीले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेत शिक्षण घेणाºया इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जातीचे मुले, अनुसूचित जमातीची मुले व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जाते. प्रती गणवेश खरेदीसाठी ३०० रुपये असे एकूण दोन गणवेशासाठी ६०० रुपये शाळा व्यवस्थापन समितीला आता दिले जाणार आहेत.गोंदिया जिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना गणवेशासाठी ४ कोटी ५१ लाख ६५ हजार ६०० रूपये लागणार आहेत. यापैकी गणवेशाचे १ कोटी रूपये गोंदियाच्या समग्र शिक्षा अभियानाकडे आहेत. उर्वरीत ३ कोटी ५१ लाखाची मागणी करण्यात आली आहे. परंतु आतापर्यंत गणवेशाची रक्कम महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईकडून अद्याप मिळालेली नाही. २६ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे.पहिल्या दिवशी गणवेश मिळणे आवश्यक असतांना निधी न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गणवेशाविना जाणार नाही.गणवेशाचा हिशेब व्यवस्थापन समितीकडेचशासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप केले जाते. मात्र मागील वर्षीपासून शासनाने गणवेशाचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात (डीबीटी) जमा करण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे अर्धे सत्र लोटूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते.परंतु त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही ही बाब लक्षात आल्यावर आता गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात टाकली जाणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी