शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर कर्जमाफीची दहावी यादी आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 22:21 IST

मागील चार महिन्यापासून कर्जमाफीच्या दहाव्या ग्रीन यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ९ हजार ४०७ शेतकऱ्यांची ग्रीन यादी गुरूवारी (दि.४) बँकेला प्राप्त झाली असून या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज खाते शून्य केले जाणार आहे.

ठळक मुद्दे९ हजार ४०७ शेतकऱ्यांचा समावेश : २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त, बँका लागल्या कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील चार महिन्यापासून कर्जमाफीच्या दहाव्या ग्रीन यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ९ हजार ४०७ शेतकऱ्यांची ग्रीन यादी गुरूवारी (दि.४) बँकेला प्राप्त झाली असून या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज खाते शून्य केले जाणार आहे. यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी सुध्दा बँकाना प्राप्त झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील ८६ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले होते. यापैकी ६० हजार शेतकऱ्यांना आत्तापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. मात्र उर्वरित २६ हजारावर शेतकरी मागील वर्षभरापासून कर्जमाफीपासून वंचित होते.या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने खरीप हंगामात नवीन पीक कर्जाची उचल करण्यापासून वंचित राहावे लागले. तर काही शेतकऱ्यांना सावकारांकडून व्याजाने कर्ज घेवून कर्जाची उचल करावी लागली. वर्षभराचा कालावधी लोटूनही कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये यावरुन संभ्रमाचे वातावरण होते. महाआॅनलाईनकडून बँकाना कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची ग्रीन यादी पाठविण्यास विलंब केला जात होता. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते.लोकमतने जिल्ह्यातील कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा सातत्याने लावून धरला. कर्जमाफीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती वाढता असंतोष पाहून शासनाने जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ९ हजार ४०७ शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी बँका आणि जिल्हा निंबंधक कार्यालयाला पाठविली आहे. यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी सुध्दा उपलब्ध करून दिला असून येत्या दोन तीन दिवसात कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सदर रक्कम जमा करून त्याचे कर्ज खाते शून्य केले जाणार आहे. त्यामुळे संकटातील शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.येलो यादीतील किती शेतकरी पात्र ठरणारपंधरा दिवसांपूर्वीच जिल्हा बँकेला महाआॅनलाईनकडून १८ हजार ७२५ शेतकऱ्यांची येलो यादी पडताळणीसाठी प्राप्त झाली. सध्या या यादीची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे पडताळणीनंतर या यादीतील किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरतात याकडे लक्ष लागले. ही येलो यादी पडताळणी करुन तिचे ग्रीन यादीत रुपातंर करण्यासाठी पुन्हा महॉआॅनलाईनकडे पाठविली जाणार आहे.आता प्रतीक्षा शेवटच्या यादीचीजिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी आत्तापर्यंत बँकेला प्राप्त झाली आहे. आता अखेरची अकारावी यादी येणार असून त्यात किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरतात हे कळणार आहे. बँक अधिकाऱ्यांच्या मते ही शेवटची यादी असणार आहे. त्यामुळे या यादीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी