शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर त्या हॉट मिक्स प्लांटच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 20:54 IST

तालुक्यातील सोमलपूर गंगेझरी येथील गट क्रं.१६ मध्ये भिवखिडकी सिरेगाव तलावाजवळ सुरु असलेल्या हॉट मिक्स प्लांटमुळे पर्यावरण धोक्यात आले होते. या प्लांटमुळे अवैध उत्खनन केले जात असल्याची तक्रार जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी केली होती.

ठळक मुद्देवन कायद्याचे उल्लघंन : नायब तहसीलदार करणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील सोमलपूर गंगेझरी येथील गट क्रं.१६ मध्ये भिवखिडकी सिरेगाव तलावाजवळ सुरु असलेल्या हॉट मिक्स प्लांटमुळे पर्यावरण धोक्यात आले होते. या प्लांटमुळे अवैध उत्खनन केले जात असल्याची तक्रार जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी केली होती. त्याचीच दखल घेत अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार यांनी या प्लांटची चौकशी करण्याचे निर्देश नायब तहसीलदार एम.यू.गेडाम यांना दिले आहे.तहसीलदारांनी दिलेल्या आदेशात त्या परिसरात असलेली गिट्टीची साठवणूक व परवानगी पत्र यासंदर्भात सविस्तर चौकशी करण्याचे निर्देशही नायब तहसीलदारांना दिले आहे. त्यामुळे आता हॉट मिक्स प्लांटवर कोणती कारवाई होणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सिरेगाव तलावाजवळ हॉट मिक्स प्लांट सुरु करण्यात आला असून प्रदूषण महामंडळाचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. यामुळे पर्यावरणाला सुध्दा धोका निर्माण झाला होता.हॉट मिक्स प्लांटला लागून तलाव व जंगल आहे. त्यामुळे परिसरात वन्यप्राणी व जैवविविधता पहावयास मिळते. मात्र, प्लांटमधून निघणारा धूळ, प्लांटमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ये-जा प्लांटमधून होणारे ध्वनी प्रदूषण यामुळे परिसरातील तलावात वास्तव करणारे विदेशी पक्षी, वन्यप्राणी यांना सुध्दा धोका निर्माण झाला होता.यासंदर्भात जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. दरम्यान हॉट मिक्स प्लांटवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली होती. तहसीलदार यांनी स्थानिक तलाठ्याकडून प्लांटची सर्व माहिती घेतली. प्लांट परिसरात अंदाजे ३०० ब्रास काळी गिट्टी पडून आहे. त्याचे वाहतूक परवाना गोंदिया येथील एका आॅफीसमध्ये जमा केल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सोमलपूर ग्रामपंचायतीकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतले असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकरणाची घटनास्थळी जाऊन चौकशी करावी व तसा अहवाल सादर करण्याचे आणि संबंधितांकडे परवाना नसलेल्या सर्व साहित्याची जप्ती करण्याचे निर्देश नायब तहसीलदार एम.यू.गेडाम यांना दिले आहे.

टॅग्स :environmentवातावरण