शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर धान खरेदीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 05:00 IST

राज्य शासनाच्या कृषी विभागाने केंद्राला पेरणी संदर्भातील चुकीची आकडेवारी दिली होती. सुरुवातीला राज्य शासनाने संपूर्ण राज्याचे पेरणी क्षेत्र ५६०८ हेक्टर पाठविले होते. त्यापैकी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पेरणीचे क्षेत्र ४०३२५ हेक्टर  दिल्याने केंद्राने राज्य शासनाला १५ लाख क्विंटलचे उद्दिष्ट दिले. ते पूर्ण झाल्यानंतर भंडारा-गोंदियाच्या कृषी विभागाने मे महिन्यात १०७१२८ हेक्टर लागवडीचा अहवाल पाठवला. या आधारे राज्याला २७६०००० क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उद्दिष्ट पूर्ण झाल्याने मागील १५ दिवसांपासून धान खरेदी बंद असल्याने चिंताग्रस्त असलेल्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाने राज्य शासनाच्या रब्बी धान खरेदीचे उद्दिष्ट पुन्हा एकदा वाढवून दिले असून या संदर्भातील आदेश २ जुलै रोजी काढण्यात आले आहेत. खासदार सुनील मेंढे यांच्या सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्याचे हे फलित असून उद्यापासून पुन्हा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी सुरू होणार आहे.राज्य शासनाच्या कृषी विभागाने केंद्राला पेरणी संदर्भातील चुकीची आकडेवारी दिली होती. सुरुवातीला राज्य शासनाने संपूर्ण राज्याचे पेरणी क्षेत्र ५६०८ हेक्टर पाठविले होते. त्यापैकी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पेरणीचे क्षेत्र ४०३२५ हेक्टर  दिल्याने केंद्राने राज्य शासनाला १५ लाख क्विंटलचे उद्दिष्ट दिले. ते पूर्ण झाल्यानंतर भंडारा-गोंदियाच्या कृषी विभागाने मे महिन्यात १०७१२८ हेक्टर लागवडीचा अहवाल पाठवला. या आधारे राज्याला २७६०००० क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले. दोन्ही वेळा राज्य शासनाने केंद्राला चुकीचा अहवाल दिल्याने धान खरेदीचे उद्दिष्ट कमी मिळाले. त्यामुळे धान खरेदी बंद झाली. यामुळे धान विकल्या न गेल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची होत असलेली तगमग पाहून खासदार मेंढे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून उद्दिष्ट वाढवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश येत अखेर शनिवारी (दि.२) केंद्र शासनाने पत्र काढीत राज्याचे धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिल्याचे स्पष्ट केले. २७ लाख क्विंटलवरून आता हे उद्दिष्ट ४६ लाख क्विंटल करण्यात आले आहे. त्यामुळे आता बंद पडलेली धान खरेदी उद्यापासून सुरू होणार आहे.

मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांची होणार सोय - केंद्र शासनाने जिल्ह्यातील धान खरेदीचे उद्दीष्ट वाढवून देत धान खरेदीला मुदतवाढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांची ऐन हंगामात सोय होणार आहे. जुन्या आदेशानुसार उद्दीष्ट पूर्ण झाल्याने जिल्ह्यातील धान खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे हजारो क्विटंल धान अद्याप पडून असल्याचे त्यांची अडचण झाली होती. धान विकला न गेल्याने त्यांच्या हाती पैसा नव्हता व त्यात खरिपात काय करावे असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र केंद्र शासनाने संपूर्ण परिस्थिती जाणून घेत जिल्हयातील धान खरेदीचे उद्दीष्ट वाढवून दिले. शिवाय धान खरेदीला मुदतवाढ दिल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्याकडील धान विकून हाती पैसा येणार. अशात त्यांना खरिपात येत असलेली अडचण सुटणार व खरिपातही चांगले उत्पादन घेता येणार आहे. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड