शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर एफडीएचे पत्रक धडकले

By admin | Updated: September 2, 2016 23:58 IST

गणेशोत्सवात महाप्रसाद वितरणासाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी आवश्यक असतानाही प्रशासनाकडून काहीच हालचाली नव्हत्या

महाप्रसाद वितरणासाठी नोंदणी : पत्रकातून दिल्या मार्गदर्शक टिप्स गोंदिया : गणेशोत्सवात महाप्रसाद वितरणासाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी आवश्यक असतानाही प्रशासनाकडून काहीच हालचाली नव्हत्या किंवा तसे आवाहन करण्यात आले नव्हते. याबाबत ‘लोकमत’ने बातमीच्या माध्यमातून एफडीएचे हे दुर्लक्ष उजेडात आणताच विभागाकडून शुक्रवारी (दि.१) पत्रक धाडण्यात आले. या पत्रकातून एफडीएने महाप्रसादाचे आयोजन करताना परवानगी घेण्याचे आवाहन करीत मार्गदर्शक टिप्स दिल्या आहेत.गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणपती उत्सव मंडळांकडून भाविकांसाठी महाप्रसाद वितरण केले जाते. ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांसाठी या महाप्रसादाचा मोठा आधार होतो. मात्र महाप्रसादातून कित्येकदा विषबाधेचेही प्रकार घडत असल्याचे दिसून येते. अशात मात्र महाप्रसाद वितरण करणारे मंडळ आपले हातवर करतात. असले प्रकार घडू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे मंडळांना नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र याबाबत आजवर अन्न व औषध प्रशासनाकडून ना जाहीरात ना पत्रकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. परिणामी गणपती उत्सव मंडळांकडून आपल्या मर्जीने महाप्रसाद वाटपाचे पुण्य कमाविले जाते. महाप्रसादाची एफडीएची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे बोलले जात असतानाही एफडीएकडून याविषयी काहीच हालचाली नव्हत्या. यावर ‘लोकमत’ने शुक्रवारी (दि.१) बातमीच्या माध्यमातून हा प्रकार उजेडात आणला. कित्येक लोकांच्या आरोग्याच्या या महत्वपूर्ण अशा या बाबीला घेऊन अन्न व औषध प्रशासन किती गंभीर आहे याची प्रचिती त्यांच्या या कार्यातून आली. विशेष म्हणजे ही बातमी प्रकाशित होताच अन्न व औषध प्रशासनाकडून शुक्रवारीच (दि.१) महाप्रसादाच्या परवानगीसाठी पत्रक धाडण्यात आले. या पत्रकातून प्रशासनाने महाप्रसाद वितरणासाठी मंडळांना आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)सहकार्य करण्याचे आवाहनअन्न व औषध प्रशासनाकडून गणपती मंडळांना महाप्रसाद वितरणासाठी काही टिप्स दिल्या आहेत. यात प्रसाद तयार करताना जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी, प्रसादासाठी लागणारा कच्चा माल परवानाधारक व नोंदणीकृत व्यवसायीकांकडूनच खरेदी करावे, प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ व झाकण असलेली असावी, फळांचा वापर होत असल्यास कच्चे व सडलेले फळ वापरू नये, आवश्यक तेवढ्याच प्रसादाची निर्मिती करावी, प्रसादासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य असावे, प्रसाद तयार करणाऱ्या स्वयंसेवकास अ‍ॅप्रन, ग्लोव्हज, टोपी पुरविण्यात यावी व हात स्वच्छ धुवावेत, प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक कुठल्याही त्वचा रोग व संसर्गजन्य रोगमुक्त असावा, प्रसादात खवा-मावा सारखे नाशवंत पदार्थ उपयोगात आणले असता विशेष काळजी घ्यावी तसेच मंडळांनी प्रसादाचा कच्चामालाचे बील, प्रसाद बनविणारे व वितरण करणारे स्वयंसेवकांचे नाव व पत्ता तयार ठेवावा. तसेच तपासणीसाठी येणाऱ्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मंडळांकडून परवानगी वांद्यात अन्न व औषध प्रशासनाकडून मागील वर्षीही अशाचप्रकारे दुर्लक्ष करण्यात आले होते व परिणामी एकाही मंडळाने परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे. तोच प्रकार यंदाही घडला. मात्र ‘लोकमत’च्या बातमीमुळे अन्न व औषध प्रशासनाला जाग आली व त्यांनी पत्रक पाठवून मंडळांना नोंदणीचे आवाहन केले. मात्र उत्सवाच्या दोन दिवसापूर्वी प्रशासनाकडून पत्रक पाठविण्यात आल्याने यंदाही मागील वर्षी सारखाच प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.