शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST

तालुक्यात सिंचन क्षेत्रात धडाक्याने कामे सुरू आहेत. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-१ चे पाणी खळबंदा जलाशयात सोडून लाभक्षेत्रात १०१७१ हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. त्याचबरोबर धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ करिता २९० कोटी रुपये फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत मंजूर करवून २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जलपूजन करून पाईपलाईनच्या कामाला सुरुवात आली.

ठळक मुद्देवन्यजीव विभागाची मिळाली मंजुरी : ५०० हेक्टर जमिनीला होणार सिंचन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तालुक्यात सिंचन क्षेत्रात मोठी क्रांती होत असतानाच त्यात आता भर घालणाऱ्या निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाला वन्यजीव विभागाची मंजुरी मिळाली आहे. यामुळे येत्या ६ महिन्यांत या प्रकल्पाचे काम सुरू होणार असून धापेवाडा उपसा सिंचन टप्पा- १ व २ सोबतच निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाद्वारे १८ गावांतील ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तालुक्यात सिंचन क्षेत्रात धडाक्याने कामे सुरू आहेत. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-१ चे पाणी खळबंदा जलाशयात सोडून लाभक्षेत्रात १०१७१ हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. त्याचबरोबर धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ करिता २९० कोटी रुपये फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत मंजूर करवून २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जलपूजन करून पाईपलाईनच्या कामाला सुरुवात आली.  आतापर्यंत ८० टक्के काम प्रगतीवर असून  त्याचबरोबर भुराटोला लघु मध्यम प्रकल्पाकरिता २१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये सन १९७२ पासून २००६ पर्यंत निमगाव येथील आंबेनाला येथे प्रकल्पाला सुरू करण्याकरिता अनेक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. आमदार विजय रहांगडाले यांनी सन २०१५ पासून टप्याटप्प्याने निमगाव प्रकल्पाला मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला.  महाराष्ट्र शासनाद्वारे वन्यजीव विभागाच्या प्रकल्पाकरिता लागणाऱ्या जमिनीचा ३१ कोटींचा एफआरए निधी शासनास भरणा करण्यात आला. हा प्रकल्प नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असल्यामुळे १० किलोमीटर अंतरातील प्रकल्पास वन्यजीव मंडळाच्या मंजुरीकरिता मे २०२० मध्ये पाहणी करून ११ फेब्रुवारी २०२० रोजी ३१.७१ लक्ष व १६ फेब्रुवारी २०२१ रोजी १२.९२ लक्ष रुपये असे एकूण ४४.६३ लक्ष प्रकल्प यंत्रणेस भरण्यात आले आहे. वन्यजीव विभागाच्या मंजुरीच्या सर्व बाबी पूर्ण झाल्याने व या प्रकल्पाकरिता नाहरकत मिळाल्याने हा प्रकल्प येत्या ६ महिन्यांत सुरू होणार आहे. यामुळे धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-१ व २ सोबतच निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाद्वारे १८ गावांतील ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प