शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पोलीस उपनिरीक्षकपदी १५४ कर्मचारी रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:37 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ जून २०१६ ला परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर पात्र उमेदवारांनी ९ महिन्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकडेमी नाशिक येथे घेतले. मात्र त्यांना गृहविभागाकडून नियुक्ती आदेश देण्यास विलंब केला जात होता.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ जून २०१६ ला परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर पात्र उमेदवारांनी ९ महिन्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकडेमी नाशिक येथे घेतले. मात्र त्यांना गृहविभागाकडून नियुक्ती आदेश देण्यास विलंब केला जात होता. उपनिरीक्षकांनी ही बाब आ.फुके यांच्या निदर्शनास आणून दिली. फुके यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर फडणवीस यांनी या १५४ पोलीस उपनिरीक्षकांना नियुक्ती देण्याचे देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे हे सर्व पोलीस निरीक्षक सेवेत रूजू झाले आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ जून २०१६ ला परीक्षा घेऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर पात्र उमेदवारांनी ९ महिन्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकेडमी नाशिक येथे घेतले.परंतु मॅट कोर्टाच्या आदेशाने प्रोबेशन थांबविण्यात आले होते.१२ आॅक्टोबर २०१८ ला मॅटने पोलीस उपनिरीक्षकांना सरळ सेवेद्वारे नियुक्ती दिली. मंत्रिमंडळाने १५४ कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला असे सांगण्यात आले. त्यानंतर मॅटने कर्मचाºयांच्या बाजूने निर्णय दिला. परंतु गृह विभागाकडून नियुक्ती देण्यासंदर्भात दिरंगाईमुळे केली जात होती. ही बाब पोलीस उपनिरीक्षकांनी आ. फुके यांच्या निदर्शनास आणून दिली.फुके यांनी पोलीस उपनिरीक्षकांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून गृह विभागाकडून नियुक्ती संदर्भात होत असलेल्या दिंरगाईबाबत चर्चा केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहविभागाला सर्व १५४ पोलीस उपनिरीक्षकांना नियुक्ती आदेश देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सर्व १५४ कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाले. याबद्दल त्यांनी फुके यांची भेट घेऊन त्यांचे व मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

टॅग्स :Policeपोलिस