शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सालेकसा धान खरेदीची चौकशी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 21:35 IST

सालेकसा तालुक्यातील एका सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानापेक्षा संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी मागील दोन महिन्यांपासून सुरू होती.

ठळक मुद्देसंडे अँकर । आठवडाभरात येणार अहवाल, धानाची उचल पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सालेकसा तालुक्यातील एका सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानापेक्षा संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी मागील दोन महिन्यांपासून सुरू होती. ही चौकशी आता अंतिम टप्प्यात असून येत्या आठवडाभरात चौकशी अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन काही ठिकाणी सहकारी संस्थेच्या माध्यमातून केंद्र सुरू करुन धान खरेदी करते. फेडरेशनकडून संस्थाना प्रती क्विंटलवर कमिश्न दिले जाते. मागील खरीप हंगामात सालेकसा येथील सहकारी संस्थेने १ लाख ४० हजार क्विंटल धान खरेदी केली होती. यापैकी ६९ हजार क्विंटल धानाची भरडाईसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनन उचल केली होती. त्यामुळे उर्वरित धान संस्थेच्या गोदामात शिल्लक असणे आवशक होते. मात्र प्रत्यक्षात संस्थेच्या गोदामात ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी गांर्भियाने दखल घेत संस्थेच्या गोदामाला सिल ठोकून धानाची मोजणी करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी मार्केटिंग फेडरेशनचे महासंचालक, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा मार्केटिंग यांचा समावेश असलेली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने गोदामात नेमके किती धान कमी अथवा बरोबर हे ठरविण्यासाठी धानाची उचल करुन वजन करावे लागेल असे सांगितले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी धानाची उचल करुन वजन करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार मागील दीड महिन्यापासून गोदामातून धानाची उचल करुन वजन करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून येत्या आठवडाभरात याचा चौकशी अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.मुख्यमंत्र्यांनी घेतली दखलसालेकसा येथील सहकारी संस्थेतंर्गत खरेदी करण्यात आलेल्या धान खरेदीत ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर यासंबंधिचे वृत्त देखील प्रकाशित झाले. विधानमंडळात सुध्दा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा दखल घेत त्वरीत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी जलद गतीने करण्यात आली.तक्रारीवरच प्रश्नचिन्हसालेकसा येथील सहकारी संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा गोदामात ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशी दरम्यान धानाची मोजणी सुरू असून त्यात धान कमी असल्याचे आत्तापर्यंत आढळले नाही. त्यामुळे या तक्रारीवरच आता प्रश्न चिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे.सालेकसा येथील धान खरेदी घोळ प्रकरणाची चौकशी अंतीम टप्प्यात आहे. येत्या आठवडाभरात या प्रकरणाचा चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल.- सुभाष चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड