शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीवर चढून शेतक-याची वीरुगिरी, शेतात जाण्याचा रस्ता मोकळा करुन द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 17:52 IST

शेतात जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करुन देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे पाच वर्ष पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने शेतक-याने पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी करित आत्महत्या करण्याचा इशारा दिला. ही घटना शुक्रवारी(दि.६) सकाळी ७ वाजताच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील भडंगा येथे उघडकीस आली.

गोरेगाव (गोंदिया) : शेतात जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करुन देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे पाच वर्ष पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने शेतक-याने पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी करित आत्महत्या करण्याचा इशारा दिला. ही घटना शुक्रवारी(दि.६) सकाळी ७ वाजताच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील भडंगा येथे उघडकीस आली. दुपारी ४ वाजेपर्यंत शेतकरी पाण्याच्या टाकीवरच बसून होता.कोमल प्रसाद कटरे, रा. भडंगा, असे वीरूगिरी करणा-या शेतक-याचे नाव आहे. त्यांच्या शेतात जाणारा रस्ता शेतक-याने बंद केला. त्यामुळे शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी कटरे यांनी मागील ५ वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. परिणामी सदर शेतक-याला शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईच्या धोरणाला कंटाळून कोमल कटरे हा शेतकरी शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गावातील पाणी टाकीवर चढला. शेतात जाणारा रस्ता मोकळा करून दिला नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा दिला. या घटनेची माहिती गावात पसरताच गावकरी मोठ्या संख्येनीे पाणी टाकीजवळ गोळा झाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गोरेगावचे तहसीलदार तहसीलदार कल्याणकुमार डहाट हे कर्मचा-यांसह घटनास्थळी पोहोचले. कटरेची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र यापूर्वी देखील प्रशासनाने आश्वासने देवून त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे आश्वासनावर माघार घेण्यास कटरेने नकार दिला.काय नेमके प्रकरणभंडगा येथील शेतकरी कोमल कटरे यांच्या शेतात लागूनच द्वारकाप्रसाद दमाहे यांची शेती असून कटरे यांच्या शेताला लागून सरकारी जमीन आहे. त्याच जमिनीतून कोमलप्रसाद कटरे यांच्या शेतात जाण्याचा रस्ता आहे. या रस्त्यावर व जागेवर द्वारकाप्रसाद दमाहे यांनी अतिक्रमण करुन रस्ता बंद केल्याचे कोमलप्रसाद कटरे यांचे म्हणणे आहे. गेल्या ५ वर्षापासून शासन व प्रशासनाला पुरावे सादर करुन अतिक्रमित जमिन शासन जमा करुन रस्ता मोकळा करुन द्या. यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. शेवटी न्यायालयाच्या निर्णयानुसार १५ फुटांचा रस्ता कटरे यांना तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी मिळवून दिला. पण हे प्रकरण द्वारकाप्रसाद दमाहे यांनी न्यायालयात प्रविष्ठ केल्यामुळे न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत रस्ता पुन्हा बंद केला. परिणामी कटरे यांची शेती गेल्या चार वर्षापासून पडीक आहे. त्यामुळे शेतक-यांनी हतबल होऊन शेवटी पाण्याच्या टाकीवर चढून न्याय द्या अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा दिला.अधिकारी कर्मचारी भंडगा येथेकोमल कटरे या वीरुगिरी करणा-या शेतक-याची समजूत घालण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात आले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कटरे यांचे आंदोलन सुरूच होते. घटना स्थळावर पोलीस विभागाचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. तहसीलदार कल्याणकुमार डहाट, नायब तहसीलदार सोमनाथ माळी, तलाठी डहाट व तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.