शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

निमगाव प्रकल्पाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 22:16 IST

तिरोडा तालुक्यातील निमगाव लघु सिंचन प्रकल्प वन विभागाच्या क्षेत्रात येत असल्याने गेल्या ४० वर्षांपासून रखडला होता. परिणामी परिसरातील ८१८ हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित होती.

ठळक मुद्देवन विभागाला देणार १४ कोटी : ४० वर्षांनंतर राज्य सरकारची मंजुरी

डी.आर.गिरीपुंजे ।लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तिरोडा तालुक्यातील निमगाव लघु सिंचन प्रकल्प वन विभागाच्या क्षेत्रात येत असल्याने गेल्या ४० वर्षांपासून रखडला होता. परिणामी परिसरातील ८१८ हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित होती. मात्र बुधवारी (दि.२०) रोजी राज्य सरकारने या प्रकल्पातील अडचण दूर केल्याने निमगाव लघु सिंचन प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.तिरोडा तालुक्यातील नक्षलग्रस्त भागातील सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी निमगाव लघु प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात वनविभागाच्या मोठ्या प्रमाणावर जमिन जात होती. प्रकल्पात जाणाºया जमीनीचा मोबदला वनविभागाला दिल्याशिवाय हा प्रकल्प मार्गी लागणे शक्य नव्हते. वनक्षेत्राच्या भरपाईपोटी १४ कोटी २६ लाख ८६ हजार रुपये देण्यास मागील ४० वर्षांपासून चालढकल केली जात होती. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यात अडथळा निर्माण झाला होता.वन विभागाला देय असलेली रक्कम शासनाने मंजूर करावी आणि या प्रकल्पाच्या मार्गातील अडथळा दूर करावा. यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.त्याचीच दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी प्रदान केली. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला असून तब्बल ८१८ हेक्टर जमीनीला सिंचनाची सोय होणार आहे. हा प्रकल्प विदर्भातील नक्षलग्रस्त भागातील सिंचनाचा विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. तिरोडा तालुक्यातील असून याच्या बुडीत क्षेत्रात वनविभागाच जमीन जात आहे. त्याच्या नुकसान भरपाईपोटी उर्वरीत १४ कोटी २६ लाख ८६ हजारांचा निधी वनविभागास देण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली.या प्रकल्पातील प्रस्तावित गावे आर्थिकदृष्ट्या मागासली असून यामध्ये आदिवासी जाती जमाती, भूमिहिन व दारिद्रय रेषेखालील कुटूंबाचा समावेश आहे. या भागाच्या विकासासाठी हा प्रकल्प गरजेचे आहे.प्रकल्प झाला १ हजार कोटीचाप्रकल्पाला महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागाने ९ जुलै १९७३ नुसार मंजुरी दिली होती. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत २३ कोटी ७० लाख रुपये होती. त्यावेळी कामाला सुरुवात होऊन ९० टक्के मातीकाम व पाळीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाअंतर्गत काही प्रमाणात वनभूमी बुडीत क्षेत्रात येते होते. त्यामुळे मागील ४० वर्षापासून हा प्रकल्प रखडला. परिणामी प्रकल्पाच्या किंमतीत पाच ते दहा पट वाढ झाली असून २३ कोटीच्या प्रकल्पाची किंमत आता १ हजार कोटींवर पोहचली आहे.पाठपुराव्याला यशधापेवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी खळबंदा जलाशयात पडले तसेच चोरखमारा, बोदलकसा जलाशयात पाडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न व निधी मंजूर केला. निमगाव (आबेनाला) लघु प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा व निधी मंजूर करण्यासाठी शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला.