शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

२.२१ कोटींचा अपहार करणार्‍या नाझरवर गुन्हा दाखल

By admin | Updated: June 8, 2014 23:56 IST

देवरी येथील तहसील कार्यालयात कार्यरत नाझर म्हणून कार्यरत असलेले नामदेव शंकर बुटे याने विविध योजनेचे २ कोटी २१ लाख ६0 हजार ६0५ रूपये बँकेतून खोट्या दस्तावेजाच्या आधारे काढले.

आरोपी फरार : देवरी तहसील कार्यालयातील प्रतापगोंदिया : देवरी येथील तहसील कार्यालयात कार्यरत नाझर म्हणून कार्यरत असलेले नामदेव शंकर बुटे याने विविध योजनेचे २ कोटी २१ लाख ६0 हजार ६0५ रूपये बँकेतून खोट्या दस्तावेजाच्या आधारे काढले. त्या नाझर विरुध्द देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अतवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना द्यायच्या शासकीय मदतीचे धनादेश परस्पर वटवून त्यांचा अपहार केल्याची तक्रार तहसीलदार रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी केली होतीे. मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात आणि पावसाळा संपल्यानंतरही जिल्ह्यात झालेल्या अतवृष्टीने शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे केंद्र सरकारच्या आपत्ती निवारण समितीने चमू पाठवून पिकांची पाहणी केली. राज्य सरकारनेही हिवाळी अधिवेशनात मदत जाहीर केली होती.ही मदत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्यांच्या बँक खात्यात जमा करायची होती. हे काम तहसील कार्यालयामार्फत केले जात आहे. देवरी तालुक्यातील लाभार्थी शेतकर्‍यांची यादी आणि त्यांच्या मदतीच्या रकमेची यादी तहसील कार्यालयाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे देण्यात आली. सोबतच त्यांच्या मदतीचा धनादेशही बँकेकडे देण्यात आला. परंतु देवरी तहसील कार्यालयाचे नाझर नामदेव शंकर बुटे यांनी गेल्या डिसेंबर महिन्यापासून तहसीलदारांकडून बँकेकडे देण्यात आलेले धनादेश प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या खात्यावर वळते न करता स्वत:च ती रक्कम काढून घेतली. हा प्रकार डिसेंबर २0१३ ते ३ मे २0१४ या दरम्यान घडला. ही रक्कम हडप केल्याचा प्रकार विद्यमान तहसीलदार चव्हाण यांच्या लक्षात आला. आतापर्यंत २ कोटी २१ लाख ६0 हजार ६0५ रुपयांची रक्कम हडप केल्याने देवरी पोलिसात त्याच्या विरूध्द भादंविच्या कलम ४0९, ४६७, ४६८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र नाझरला अटक करण्यात आली नाही. तो फरार असल्याचे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)