शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

घोटाळेबाज किरीट सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 05:00 IST

सोमय्या यांनी सन २०१३ मध्ये आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी मोहीम सुरू करून सढळ हाताने मदत करण्यासाठी आवाहन केले होते. त्यासाठी त्यांनी प्रचंड निधी जमा करून तो निधी राजभवनात न देता स्वतःच्या स्वार्थासाठी वापरल्याची शंका व्यक्त होत आहे. किरीट सोमय्या यांनी हा प्रकार करून देशाशी एकप्रकारे गद्दारीच केल्याचे दिसून येत आहे. भाजपचे केंद्र सरकार राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरुद्ध सुडाचे राजकारण करत आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :  आयएनएस विक्रांतच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी जिल्हा शिवसेनेने केली. यासाठी शिवसेनेच्यावतीने गुरुवारी (दि.७) उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन निदर्शने करीत जोडे मारो आंदोलन केले. तसेच सोमय्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.   सोमय्या यांनी सन २०१३ मध्ये आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी मोहीम सुरू करून सढळ हाताने मदत करण्यासाठी आवाहन केले होते. त्यासाठी त्यांनी प्रचंड निधी जमा करून तो निधी राजभवनात न देता स्वतःच्या स्वार्थासाठी वापरल्याची शंका व्यक्त होत आहे. किरीट सोमय्या यांनी हा प्रकार करून देशाशी एकप्रकारे गद्दारीच केल्याचे दिसून येत आहे. भाजपचे केंद्र सरकार राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरुद्ध सुडाचे राजकारण करत आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. अख्खा महाराष्ट्र हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. मात्र भाजपचाच नेता आणि याच केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रवक्ता असल्यासारखा वावरणाऱ्या सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा घोटाळा करून देशाशी गद्दारी केली. या देशद्रोह्याची जागा तुरुंगातच असायला हवी. याबाबतचे सत्य जनतेसमोर आणावे व सोमय्याला तत्काळ अटक करावी, अन्यथा गोंदिया जिल्हा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात महिला आघाडी संघटिका प्रीती देशमुख, जिल्हा संघटक अशोक आरखेल, तालुका संघटक संजू समशेरे, शहर संघटक विनीत मोहिते, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यक जाबिर शेख, अल्पसंख्यक शहरप्रमुख सलमान पठाण, अल्पसंख्यक उपजिल्हाप्रमुख शाहरुख पठान, ललित अतकरे, विवेक पारधी, आसू मक्कड, ऋषभ मिश्रा, अमनदीप भाटिया, विक्की बोमचेर, बालू तिघारे, दिनेश राऊत, महेंद्र बघेले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 जोडे मारून पोस्टर फाडले - या आंदोलनांतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज  यादव यांच्या मार्गदर्शनात जिल्हा संपर्कप्रमुख मुकेश शिवहरे व जिल्हा समन्वयक सुनील लांजेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोमय्या यांच्या पोस्टरला जोडे मारून निदर्शने करण्यात आली. तसेच सोमय्या यांचे पोस्टर फाडून आंदोलन करण्यात आले. दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याShiv Senaशिवसेना