लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तेंदुपत्ता व्यवसायाला मागील वर्षी आलेली अवकळा यंदाही असणार असे चित्र दिसून येत आहे. तेंदुपत्ता व्यवसायावर मंदीमुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान झाले असतानाच मजुरांनाही त्याची झळ सहन करावी लागली होती. तीच परिस्थिती यंदाही निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.तेंदुपत्ता व्यवसायासाठी एके काळी गोंदिया जिल्हा प्रसिद्ध होता. येथील धानाच्या कोठारासह बीडी उद्योगाची जोड जिल्ह्याला दिली जात होती. येथील बीडी उद्योगावर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल चालत होती व कित्येक मजुरांचे भरणपोषण होत होते.मात्र हळूहळू तेंदुपत्ता उद्योगाला अवकळा लागली व तेंदुपत्ता व्यवसाय डबघाईस निघू लागल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील तेंदुपत्ता व्यवसाय व त्यावर आश्रीत मजुरांवर पडू लागला आहे. सन २०१७ दरम्यान तेंदुपत्ता विक्रीत चढाव आला होता व त्यावर्षी जिल्ह्यात जोमात तेंदुपत्ता विक्री झाली होती.तेदुपत्ता लिलावातन शासनाला ३४.३३ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. तर सन २०१८ मध्ये तेंदुपत्ता विक्रीत अचानक घट आली व शासनाला यावर्षी फक्त ७.८८ कोटींचा महसूल मिळाला होता. म्हणजेच, २६ कोटीं पेक्षा जास्तीचा महसूल बुडाला होता. यंदाही असेच काहीसे चित्र बघावयास मिळत असून असे झाल्यास शासनासह मंजुरांचेही चांगलेच नुकसान होणार आहे.सन २०१७ दरम्यान व्यापाऱ्यांना चांगलाच नफा झाल्याचे बोलले जाते. मात्र शासनाकडून निर्धारित तेंदुपत्ता प्राप्तीचे लक्ष गाठता आले नव्हते. त्यावर्षी ४० हजार ५९५ पोती तेंदुपत्ता संकलनाचे उद्दीष्ट होते.मात्र वास्तवीक ३८ हजार ३९५ पोतींचे संकलन करण्यात आले होते. तर सन २०१८ मध्ये ३३ हजार ४८५ पोती संकलनाचे उद्दीष्ट असताना १८ हजार ७८७ पोतींचे संकलन करण्यात आले होते.म्हणजेच सन २०१७ च्या तुलनेत सन २०१८ मध्ये तेंदुपत्ता संकलन अर्धे ही होऊ शकले नाही. जिल्ह्यात २८ युनिटमधून तेंदुपत्ता संकलन होते.
तेंदुपत्ता हंगाम यंदाही ‘फिका-फिका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 20:57 IST
तेंदुपत्ता व्यवसायाला मागील वर्षी आलेली अवकळा यंदाही असणार असे चित्र दिसून येत आहे. तेंदुपत्ता व्यवसायावर मंदीमुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान झाले असतानाच मजुरांनाही त्याची झळ सहन करावी लागली होती.
तेंदुपत्ता हंगाम यंदाही ‘फिका-फिका’
ठळक मुद्देशासनाला कोट्यवधींचा चुना : मजुरांचेही होणार नुकसान