शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईनच्या खोदकामासाठी शेतातील पिके केली भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 21:38 IST

धापेवाडा उपसा सिंचन टप्पा २ चे पाणी बोदलकसा तलावामध्ये टाकण्यासाठी ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ १० टक्के काम अपूर्ण असून, फक्त सुकडी डाकराम ते पिंडकेपार सोनझारीटोली दीड कि.मी.चे काम शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी शेतातून पाईप लाईन न टाकता रस्त्याने पाईप टाकण्याची मागणी केली होती. तसेच याला विरोध केला होता. पण संबंधित विभागाने पोलीस बंदोबस्तात शेतामधून पाईप लाईन टाकली. परिणामी शेतामध्ये मोवरीच्या उभ्या पिकातून खोदकाम सुरु केले. परिणामी मोवरीचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. 

हितेंद्र जांभुळकरलोकमत न्यूज नेटवर्क सुकडी/डाकराम :  धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ च्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुकडी डाकराम येथील शेतकऱ्यांच्या शेतातून केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. पण, याकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. धापेवाडा उपसा सिंचन टप्पा २ चे पाणी बोदलकसा तलावामध्ये टाकण्यासाठी ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ १० टक्के काम अपूर्ण असून, फक्त सुकडी डाकराम ते पिंडकेपार सोनझारीटोली दीड कि.मी.चे काम शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी शेतातून पाईप लाईन न टाकता रस्त्याने पाईप टाकण्याची मागणी केली होती. तसेच याला विरोध केला होता. पण संबंधित विभागाने पोलीस बंदोबस्तात शेतामधून पाईप लाईन टाकली. परिणामी शेतामध्ये मोवरीच्या उभ्या पिकातून खोदकाम सुरु केले. परिणामी मोवरीचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. धापेवाडा उपसा सिंचन विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्या उभ्या पिकांचीसुद्धा त्यांना गय केली नाही. आधीच नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना सिंचन विभागाच्या भूमिकेमुळे कृत्रिम संकटांना तोंड द्यावे लागत आहे. धापेवाडा उपसा सिंचन विभाग तिरोडाचे कार्यकारी अभियंता ए. पी. कापसे यांच्याशी संपर्क उभ्या मोवरी पिकातून खोदकाम केले.   त्या पिकांचे नुकसानभरपाई किती देणार यावर कापसे यांनी ही माहिती तुम्हाला माहिती देण्याची गरज नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली.

नुकसानभरपाई मिळणार की नाही?- गट क्र. ३६६, १.६२ हे.आर. मध्ये मोवरी पिकाची लागवड केली होती. त्यामध्ये चार एकरांपैकी ३ एकर शेतातील मोवरी पीक पूर्णपणे नष्ट केले. पीक नष्ट झाल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांना नुकसानभरपाईसुद्धा मिळणार नाही. संबंधित विभागाचे अधिकारीसुद्धा योग्य उत्तर देत नसल्याने नुकसानभरपाई मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

माझी चार एकर शेती असून, मोवरी पिकापैकी तीन एकर मोवरी पीक पूर्णपणे भुईसपाट झाले. त्यांचे नुकसानभरपाईसाठी अधिकारी, कर्मचारी कोणीच सांगायला व बोलायला तयार नाही. आम्हा शेतकऱ्यांचा कोणीच वाली नाही.  - ईश्वर लांजेवार, सुकडी डाकराम

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती