शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुंपणात वीज प्रवाह सोडणाऱ्यांची गय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 21:38 IST

शेताच्या कुंपणात अवैधरित्या वीज पुरवठा सोडल्यास संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा कायम स्वरु पी खंडित करण्यात येत असून भारतीय विद्युत कायदा २००३ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कठोरशिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे आता पुढे अशा प्रकराचे कृत्य करणाºयांची गय केली जाणार नाही.

ठळक मुद्देकठोर शिक्षेची तरतूद : महावितरण उचलणार कठोर पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेताच्या कुंपणात अवैधरित्या वीज पुरवठा सोडल्यास संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा कायम स्वरु पी खंडित करण्यात येत असून भारतीय विद्युत कायदा २००३ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कठोरशिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे आता पुढे अशा प्रकराचे कृत्य करणाºयांची गय केली जाणार नाही. वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहीत करण्यात येत असल्याने मागिल काही महिन्यांत अनेक वन्य प्राणी आणि मणुष्य हानी झाली आहे. शिवाय अशा प्रकारच्या घटनांचा गैरफायदा घेत शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहीत करून वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. जिल्ह्यातही अशाप्रकारच्या कित्येक घटना घडल्या आहेत. विदर्भातील वन परिक्षेत्रालगतच्या परिसरातील शेतातील पिकाच्या रक्षणासाठी शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहीत करण्यात येत असली तरी यामुळे होणारे प्राणांकीत अपघात सर्वस्वी चिंतेचा विषय आहे. २३ मे रोजी जिल्ह्यातील सडक-अर्जूनी तालुक्यातील रेंगेपार येथे शेती कुंपणातील विजेच्या धक्क्याने रानगव्याचा मृत्यू झाला होता. वन्यप्राण्यांसोबतच याचा फटका सामान्य जनतेलाही बसत आहे. शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहीत करणे म्हणजे वीजेचा अवैध वापर असून याकरिता भारतीय विद्युत कायदयातशिक्षेची तरतूद आहे. अशात मनुष्यहानी झाल्यास सदोष मनुष्यवध किंवा मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ आणि इतर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो. तसेच एखाद्या वन्य प्राण्याचा मृत्यू झाल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत असून यात ७ वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. सोबतच अशाप्रकारे शेती कुंपणात वीज प्रावाहित करणाºयांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्याचीही तरतुद असल्याने शेतकºयांनी अशाप्रकारे वीजेचा अवैध वापर टाळावे असे महावितरणने कळविले आहे.

टॅग्स :electricityवीज