शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री शक्ती तुझी ही कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:42 IST

आठ मार्च, जागतिक महिला दिन. महिला सशक्तीकरण दिवस, महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ संबंध जगात साजरा केला जाणारा हा दिवस.

ठळक मुद्देजागतिक महिला दिन : नवेगावबांधच्या पात्रे कुटुंबीयांची कहाणी

संतोष बुकावन/रामदास बोरकर ।ऑनलाईन लोकमतअर्जुनी मोरगाव : आठ मार्च, जागतिक महिला दिन. महिला सशक्तीकरण दिवस, महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ संबंध जगात साजरा केला जाणारा हा दिवस. महिलांनी आपले होणारे शोषण व अन्यायाविरुद्ध संघटितपणे आवाज उठविला. सामूदायिकरीत्या रस्त्यावर उतरुन आपला आवाज बुलंद केला. यामुळेच त्यांच्यात आत्मविश्वास जागृत झाला. शतकानुशतके चालत आलेल्या पुरुषकेंद्री व्यवस्थेमध्ये कोंडीत सापडलेल्या महिलांनी आता कुठे का ही प्रमाणात मोकळा श्वास घेतला. आज अनेक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला पुढे येऊ लागल्या आहेत. तरीही महिला दिन साजरा करीत असाताना आजही स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने मानसन्मान मिळतो काय? स्त्री-पुरुष समानता आहे काय? हे प्रश्न कायम आहेत.भारतीय संस्कृतीत नवºयाला बायकोच्या कुंकवाचा धनी संबोधले जाते. ज्या धन्याच्या भरवशावर कुटुंबाचा गाडा चालतो त्याचा जर दुदैवी मृत्यू झाला तर त्या कुटुंबावर दु:खाचे कसे डोंगर कोसळते व ते पेलवत असताना किती हालअपेष्ठांना सामोरे जावे लागते हे त्यांनाच ठाऊक असते. नवेगावबांधच्या पात्रे कुटुंबातील तीन भावंड एकापाठोपाठ स्वर्गवासी झाले. तीन महिला विधवा झाल्या. मात्र त्यांनी धीर सोडला नाही. संयम व सन्मानाने संघटितपणे चरितार्थ चालविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सासू व तीन स्रूषा याच एकमेकांच्या आधार बनल्या. घरात अठराविश्वे दारिद्र्य असले तरी हालअपेष्ठांना सामोरे जात त्या गुण्यागोविंदाने व सन्मानाने जगत आहेत. त्यांच्या या कर्तृत्वाला महिला दिनानिमित्त सलाम !नवेगावबांध येथे पात्रे नावाचे कुटुंब आहे. भूमिहिन आहेत. मातीची भांडी तयार करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. भागरथा व श्रावण पात्रे यांना महादेव, अशोक व रामदास ही तीन मुले. तिघांचेही लग्न झाले. सोबतीला म्हातारी आई भागरथा. आधुनिक युगात कुंभाराची माती कवडीमोल झाली आहे. पूर्वी मातीची भांडी स्वयंपाकात असायची. रेफ्रीजरेटरने थंड पाण्याचे माठ हिसकावून घेतले. या व्यवसायाला अखेरची घरघर लागल्याने इतरांच्या कामावर जाऊन मोलमजुरी करणे या कुटुंबाच्या वाट्याला आले. या तीन भावंडांना चार मुले व तीन मुली अशी एकूण सात अपत्य. एकंदर १४ लोकांचा हा कुटुंब.मजुरीचे काम करीत असताना २००० मध्ये ट्रॅक्टरच्या अपघातात अशोकचा मृत्यू झाला. २०१० मध्ये रामदास व २०१४ मध्ये महादेवचा मृत्यू झाला. या कुटुंबातील तिन्ही महिला विधवा झाल्या. या कुटुंबाचा संपूर्ण भार म्हातारी भागरथा व तिन्ही सुनांवर आला. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यासाठी घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता. या तिन्ही महिलांनी हे आवाहन स्विकारले. लहान लहान मुलांच्या संगोपनाची एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली. उद्भवलेल्या परिस्थितीने न डगमगता त्यांनी मोलमजूरी करणे सुरू केले.काबाडकष्ट करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सध्या सुरू आहे. मात्र अद्यापही या कुटुंबासमोर मुलांचे शिक्षण, त्यांची कार्य, या तीन विधवा महिलांना पार पाडावी लागणार आहेत. हे कुटुंब सध्या एका तुटक्या फुटक्या घरकुलात वास्तव्यास आहेत. जुनाट घर आहे. आर्थिक विवंचनेमुळे त्याची डागडुजी कराणे शक्य नाही. नवीन घर तयार करणे तर अत्यंत कठीण बाब आहे. ऐवढे मोठे कुटुंब मोडकळीस आलेल्या घरात कसे राहील हा खरा प्रश्न आहे. प्रधानमंत्र्यांनी आवास योजनेची घोषणा केली मात्र अशा योजनांचा लाभ धनदाडग्यांना आधी होतो. नंतर योजना गोरगरीबांच्या झोपडीपर्यंत येवून पोहोचतात. विशेष उल्लेखनिय म्हणजे या कुटुंबियाच्या घरात आजपर्यंत वीज पोहचलीच नाही.परिस्थितीमुळे हतबल झालेल्या या कुटुंबात सर्वजण अल्पशिक्षितच राहिले आहेत. कुटुंबाचा गाडा चालवायचा की शिक्षण घ्यायचे हा गंभीर प्रश्न आहे. ज्या घरात शिक्षणच पोहोचले नाही ती वंशज सुद्धा आजघडीला मोलमजुरीच करतात. हे सारे काही असले तरी त्या तीन विधवा महिला खंबीरपणे जो संघर्ष करीत आहेत तो निश्चितच प्रसंशनीय आहे.अशा या कुटुंबाला सलाम ! शासन व प्रशासन अशा कुटुंबावर मायेची झालर पांघरेल का ! हा खरा प्रश्न या महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे.जन्म घेऊन कित्येक नाते जोडतेस तूजन्म देऊन कित्येक नाते निर्मितेस तूनको रडू... ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ं म्हणत तूशोध घे स्वत:चा, एक नवीन कहाणी लिही तूघर आणि करिअर, तारेवरची कसरत करतेस तूएकविसाव्या शतकातली सुपरवुमन तूरक्षण, आरक्षण हे आक्रोश सोड तूकर्म करत रहा, फळाला पात्र होशील तूभगिणी भाव जरुर पाळ तूकणखर हो, स्वत:ची मदत स्वत: हो तूविधात्याची नवनिर्माणाची कलाकृती तूएक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तूउठ चल, यशाच्या शिखरांची तुला साद... ऐ क तू‘स्त्री’ म्हणून जन्मलीस ‘ व्यक्ती’ म्हणून जग तू